मुंबई : जुन्या वीज बिल माफीच्या (accused each other of power bill waiver) जुन्या व्हिडिओ क्लिप दाखवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Uddhav Thackeray and Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना केलेल्या कामगिरीचा अहवालाच जाहीर केला आहे. त्यामुळे वीज बिल माफीवरून ठाकरे (Uddhav Thackeray) आणि फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) आता जुंपणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकऱ्यांशी संवाद मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी वीजबिल आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंनी टीका करताना फडणवीसांना ‘जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा’ असा घणाघात केला. त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी त्याच शब्दांचा पुनरुच्चार करत, उद्धव ठाकरेंचे दोन व्हिडीओ फेसबुकवर शेअर केले. तसेच ठाकरेंवर जोरदार टीकाही केली.
उद्धव ठाकरे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले. देवेंद्र यांनी 2019 आणि 2022 चे व्हिडीओ ट्विट करून वीज बिल माफीच्या आव्हानाला बगल दिला जातो आहे. तसेच शेतकऱ्यांची वीज बील माफ करून दाखवा, ही मागणी दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी काय कामे केली, याचा अहवालाच जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याचा अभ्यास करून शेतकऱ्यांची वीज बील माफ कधी करणार हे स्पष्ट करावे, असे आव्हान दिले आहे. राज्य सरकारने देशात आघाडी असलेली कामगिरी केल्याचे ठाकरे यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.