सातारा - आर्थिक अडचणीत असलेल्या मंडप, लाईट डेकोरेशन व्यवसायिकांनी केलेल्या धरणे आंदोलनाला भाजपचे खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा दिला. शासनाने या व्यावसायिकांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले.
LIVE : मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट आणि केटरर्स असोसिएशनचे एकदिवसीय धरणे आंदोलन
19:14 November 02
मंडप व्यावसायिकांच्या आंदोलनाला खासदार उदयनराजेंचा पाठिंबा
19:12 November 02
नाही तर आम्ही व्यवसाय सुरू करू..
वर्धा - टाळेबंदीनंतर अनेक व्यवसायांचा शुभारंभ झाला आहे. सरकारने लग्नसमारंभास केवळ 50 लोकांची परवानगी दिली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय मंगलकार्यालाय व्यवसायिकांना मारक ठरत आहे. एकतर मुक्तपणे परवानगी द्या, नाही तर आम्ही व्यवसाय सुरू करू, असा इशारा मंगलकार्यलय व्यावसायिकांनी आंदोलनातून दिला.
16:41 November 02
व्यवसायिकांना नुकसान भरपाई द्यावी; सांगलीतील मंडप व्यावसायिकांची मागणी
सांगली - लॉकडॉऊनचा फटका बसलेल्या मंडप,लाईट आणी डेकोरेटर्स व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आंदोलन केले आहे. धरणे आंदोलन करत व्यवसायिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह लग्नसमारंभाची असणारी मर्यादा वाढवण्यात यावी, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
16:38 November 02
सरकारकडून दुर्लक्ष झाल्याने आंदोलनाची वेळ... रत्नागिरीतील मंडप व्यावसायिकांची खंत
रत्नागिरी - ऑल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन, नवी दिल्ली संलग्न ऑल महाराष्ट्र डिलर्स ऑर्गनायझेशन यांच्या अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनने आज (दि. 2 नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे.
16:06 November 02
अनेकांवर उपासमारीची वेळ.. आता तरी परवानगी द्या; लातूर मंडप व्यावसायिकांची मागणी
लातूर - अनलॉकमध्ये सर्वकाही सुरू होत आहे. बाजारपेठ पूर्वपदावर येत आहेत. असे असताना अद्यापही लग्न समारंभ आणि त्यासंबंधी इतर व्यवसायांना परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या आठ महिन्यांपासून लग्न समारंभावर अवलंबून असलेले सर्व व्यावसाय ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने अशा व्यावसायांना परवानगी द्यावी यासाठी व्यावसायिकांनी सोमवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
15:39 November 02
लग्न सोहळ्यासाठी 500 व्यक्तींना परवानगी द्या, व्यावसायिकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
रायगड - मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीने लग्न सोहळ्यात संबंधित असलेल्या व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत रायगड जिल्ह्यातील मंडप, डेकोरेटर्स, फोटोग्राफर, केटरर्स संघटनेने आज जिल्हाधिकारी निधी चौधरी याना भेटून 500 व्यक्तीची परवानगी देण्याबाबत निवेदन दिले आहे.
15:02 November 02
..तर मंत्र्यांच्या एकाही कार्यक्रमाला खुर्ची देणार नाही,मंडप व्यायसायिकांचा इशारा
परभणी - कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारद्वारे गेल्या आठ महिन्यांपासून विविध कार्यावर, इव्हेंटवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाच्या निषेधार्थ परभणीत जिल्हा मंडप डिलर्स असोसिएशनने आज (सोमवारी) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी घोषणाबाजी करतपूर्ण क्षमतेने मंगल कार्यालये तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच यावेळी मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांच्या कार्यक्रमांना एकही खुर्ची देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
12:51 November 02
औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
औरंगाबाद - कोरोनाच्या काळात बंदी असल्याने उत्सव व समारंभाचे आयोजन केले जात नाही. परिणामी मंडप व्यावसायिक आणि संलग्न व्यवसायाईकांवर उपासमारीची वेळ आल्याने तातडीने व्यवसायावरील निर्बंध उठवावेत, अशी मागणी करत मंडप व्यवसायिकांनी एक दिवसीय आंदोलन केले.
औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडप व्यावसायिक, फोटोग्राफर, लाइट डेकोरेशन, कॅटरर्स यांनी आंदोलनात सहभाग घेतला. दिवाळीच्या काळात तेजी असल्याने तातडीने व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
12:36 November 02
बुलडाण्याच्या खामगाव येथे आंदोलनाला सुरूवात
12:18 November 02
वर्ध्यात मंगल कार्यालय व्यवसायिकांचा मूक मोर्चा
12:00 November 02
नाशिक : मंडप असोसिएशनच्या एकदिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात...
11:59 November 02
जालन्यात मंडप असोसिएशनच्या एकदिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात
11:48 November 02
रत्नागिरीत : मंडप असोसिएशनच्या एकदिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात...
11:39 November 02
कोल्हापुरात आंदोलनाला सुरूवात....
लॉकडाऊनमुळे घाईला आलेल्या मंडप, डेकोरेशन व्यवसाय धारकांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात ५०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी द्यावी, अशी मागणी करत आज कोल्हापूरात मंडप, डेकोरेशन व्यवसायधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले. आज कोल्हापुरात मंडप साउंड लाईट डेकोरेशन व्यवसायिकांनी कर्मचाऱ्यांसह मोर्चा काढला. कोल्हापुरातील दसरा चौक येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाने तात्काळ व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सागर चव्हाण यांनी केली. हा मोर्चा ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स ऑर्गनायझेशन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
11:14 November 02
हिंगोली येथे धरणे आंदोलनास सुरूवात...
10:32 November 02
Update
मुंबई - कोरोना महामारीमुळे देश व देशाअंतर्गत व्यावसायिकांना मोठ्या अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मक व राजकीय कार्यक्रमांना स्थिगिती देण्यात आली आहे. त्यामुळे टेन्ट, मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, डी. जे, साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन अडचणीत सापडले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील असोसिएशनच्या माध्यमातून अनलॉक प्रक्रियेमध्ये हॉल, मंडप उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी विविध निवेदने सुध्दा सरकारला देण्यात आली. मात्र, या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे राज्यभरातील मंडप, लाइट, साउंड इव्हेंट आणि केटरर्स चालक-मालक आज धरणे आंदोलनाला बसले आहेत.
या आहेत मागण्या -
- मंडप, लॉन, मंगल कार्यालय, हॉलच्या क्षमतेपेक्षा पन्नास टक्के आसन क्षमतेला परवानगी देण्यात यावी.
- व्यवसाय संदर्भातील संबंधित 18 टक्के जीएसटीवरून पाच टक्क्यांवर करावा.
- भाड्याचे गोदाम असणाऱ्यांचे भाडे माफ करावे.
- कर्जदारांचे व्याज माफ करावे.
- ईएमआय स्थिती सामान्य होईपर्यंत स्थगित करावे.
- सर्व मंडप व्यवसाय धारकास उद्योगाचा दर्जा दिला जावा.
- व्यवसायाच्या संबंधित सर्व व्यवसाय धारकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडीची तरतूद करावी.