ETV Bharat / state

तेलुगू कवी वरवरा राव यांना कोरोनाची लागण

एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलुगू कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तळोजा कारागृहातून उपचारांसाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Telugu poet and activist, Varavara Rao, has tested positive for COVID-19
तेलगू कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉजिटिव्ह
author img

By

Published : Jul 16, 2020, 7:22 PM IST

मुंबई - एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तळोजा कारागृहातून उपचारांसाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे त्यांच्यात दिसत नसून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जेजे रुग्णालयाचे डीन रणजित माणकेश्वर यांनी स्पष्ट केले आहे. वरवरा राव यांना पुढील उपचारांसाठी लवकरच जिटी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात असलेले ८० वर्षीय वरवरा राव यांची प्रकृती खालावत आहे. या संदर्भात राज्य सरकारने लक्ष देत त्यांना वैद्यकीय चाचण्या व इतर उपचारांसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात यावे, अशी मागणी वरवरा राव यांच्या कुटुंबीयांकडून ऑनलाइन पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. वरवरा राव यांना काही वैद्यकीय चाचण्यांसाठी जेजे रुग्णालयात सोमवारी नेण्यात आले होते.

याअगोदर, विशेष न्यायालयात वरवरा राव यांच्या वकिलामार्फत प्रकृतीच्या कारणावरून जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. राव यांच्या जामिन याचिकेवर सरकारी वकिलांनी आक्षेप नोंदवला असता सुनावणीदरम्यान विशेष न्यायालयाने वरवरा राव यांना जामीन देण्यास नकार दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.