मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेच्या ओव्हर हेड वायरवरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वसई-विरार दरम्यानची अप-डाऊन मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे अनेक लोकल सेवाना लेटमार्क लागलेला आहे.
काही मिनिटात बिघाड दुरुस्त -
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी विरार रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वेच्या ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता. या तांत्रिक बिघाडामुळे ओव्हर हेड वायरमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वसई-विरार दरम्यानची अप-डाऊन मार्गाची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, या घटनेची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाला मिळताच पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिक पथक घटनास्थळी दाखल होऊन हा बिघाड अवघ्या काही मिनिटात दुरुस्त करण्यात आला आहे. त्यानंतर 12 वाजून 22 मिनिटांनी उपनगरीय लोकल सेवा पूर्ववत धावू लागलेल्या आहेत.
हेही वाचा - अत्तरांची राजधानी 'कन्नौज' जिथं नाल्यामधूनही वाहतात अत्तर
अनेक लोकल सेवांना लेटमार्क -
विरार रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडाच्या घटनेमुळे वसई-विरार दरम्यानची अप-डाऊन मार्गाची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली होती. तसेच अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा खोळंबल्या होत्या.परिणामी या घटनेमुळे अनेक लोकल सेवांना लेटमार्क लागलेला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे.