ETV Bharat / state

Appoint teachers on hourly basis : माध्यमिक शाळांतही आता तासिका तत्त्वावरील शिक्षक - तासिका तत्त्वावर शिक्षक नेमणार

महाराष्ट्र शासनाने राज्यातील समस्त माध्यमिक शाळांसाठी आणि उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी तासिका तत्वावर शिक्षक नेमण्याचे ठरवलेले ( Decided to appoint teachers on hourly basis ) आहे.

Appoint teachers on hourly basis
माध्यमिक शाळांसाठी आता तासिका तत्त्वावर शिक्षक नेमणार
author img

By

Published : Nov 22, 2022, 12:17 PM IST

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यातील समस्त माध्यमिक शाळांसाठी आणि उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी तासिका तत्वावर शिक्षक नेमण्याचे ठरवलेले ( Decided to appoint teachers on hourly basis ) आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात दूरगामी परिणाम होण्याचा संभव (possibility of farreaching effects in education ) आहे.

Appoint teachers on hourly basis
माध्यमिक शाळांसाठी आता तासिका तत्त्वावर शिक्षक नेमणार

क्लॉक अवर बेसिस तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक : राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा अर्थात इयत्ता नववी व दहावी आणि उच्च माध्यमिक शाळा इयत्ता अकरावी व बारावी तसेच कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी तासिका तत्त्वावर अर्थात क्लॉक अवर बेसिस या तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक होणार आहे. ज्या ठिकाणी अर्धवेळ शिक्षक नसेल आणि तो उपलब्ध होऊ शकत नसेल तर आता तिथे पद हे घड्याळी तासिकेनुसार ठरवण्यात येऊन त्या आधारे त्यांना मानधन देण्यात येईल.

शिक्षकांना रुपये 150 प्रती तास असे मानधन देण्यात येणार : या तासिका तत्त्वावर ज्या शिक्षकांची नियुक्ती होईल. त्यामध्ये माध्यमिक स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रतितास 120 रुपये असे मानधन दिले जाईल. तर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या या शिक्षकांना रुपये 150 प्रती तास असे मानधन देण्यात येणार आहे. हा शासन निर्णय राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लागू असणार आहे. राज्यामध्ये मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या ही तीन लाखाच्या पेक्षा अधिक आहे. या क्षेत्रावर याचे दूरगामी परिणाम होणार आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडून याची प्रतिक्रिया उमटेल यात शंका नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.