ETV Bharat / state

विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक; आझाद मैदानात केले अर्धनग्न आंदोलन

शासनाने मार्च २०१८ च्या मुंबई अधिवेशनात १४६ उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी घोषित केले. मार्च २०१९ च्या अधिवेशनात १६५६ उच्च माध्यमिक शाळांना घोषीत केले. मात्र शासनाने 1६५६ उच्च माध्यमिक शाळांची घोषणेसबंधीचा शासन निर्णय अजूनही काढलेला नाहीत.

आझाद मैदानात अर्धनग्न आंदोलन
author img

By

Published : Aug 21, 2019, 5:31 PM IST

मुंबई - राज्यातील विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थ विभागाने तरतूद केली. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक झाली. बैठकीत आठ दिवसात कॅबिनेटची बैठक घेऊ आणि अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले होते. शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षकांचे वेतन सुरू होणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले होते. परंतू यासबंधी मंत्रालयात कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नसल्याने शिक्षकांनी आझाद मैदानावर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.

शिक्षकांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ वर्षापासून खोटी आश्वासने, खोटी माहिती व भूलथापा देण्याचेच कार्य केल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शालेय शिक्षकांनी पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात धरणे आंदोलने सुरू केले. काही शिक्षक तर सरकारचे लक्ष केद्रींत करण्यासाठी नग्न अवस्थेत धरणे देत आहेत.

शासनाने मार्च २०१८ च्या मुंबई अधिवेशनात १४६ उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी घोषित केले. मार्च २०१९ च्या अधिवेशनात १६५६ उच्च माध्यमिक शाळांना घोषित केले. अनुदानासाठी घोषित केलेल्या शाळांच्या अनुदानासाठी गेल्या अधिवेशनात आर्थिक तरतूद सुध्दा करण्यात आली होती. त्यासंबंधी सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाले. आता फक्त १६५६ उच्च माध्यमिक शाळांची घोषणा व त्यासंबंधी शासन निर्णय काढणे बाकी आहे.

मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी विना विलंब शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय जाहीर करावे. तसेच शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत थकीत पगार जमा करावा, अशा विविध मागण्या घेऊन शिक्षकांनी पुन्हा आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य करा अन्यथा येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांच्या आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शिक्षकांनी दिला आहे. शिवाय याला महाराष्ट्र शासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असे शिक्षक संघटना राज्य सचिव टी.एम. नाईक यांनी सांगितले.

Intro:

शिक्षकांचे विविध प्रलंबित मागण्यासाठी आझाद मैदानात अर्धनग्न आंदोलन

राज्यातील विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थ विभागाने तरतूद केली. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर आठ दिवसांत कॅबिनेटची बैठक घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू. येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षकांचे वेतन सुरू होईल, या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनपूर्तीसाठी मंत्रालयात कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नसल्याने पुन्हा अनुदानाची आशा मावळलेल्या शिक्षकांनी मुंबईत आझाद मैदानावर अर्धनग्न आंदोलन केले आहे.

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ वर्षापासून खोटी आश्वासने, खोटी माहिती व भूलथापा देण्याचेच कार्य केल्याचा आरोप या शिक्षकांचा आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमिक शालेय शिक्षकानीं पुन्हा एकदा आता शेवटचे हे धरणे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरु केले आहे काही जण नग्न अवस्थेत सरकारच लक्ष केंद्रित करण्यासाठी आझाद मैदानात बसले आहेत.

शासनाने मार्च २०१८ च्या मुंबई येथील अधिवेशनात १४६ उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी घोषीत केले. मार्च २०१९ च्या अधिवेशनात १६५६ उच्च माध्यमिक शाळांना अघोषीत ठेवून या सर्वाची म्हणजे १४६+१६५६ शाळाची अनुदानाची गेल्या अधिवेशनात आर्थिक तरतूद सुध्दा केली.त्यासंबंधी सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झालेले असून आता फक्त १६५६ उच्च माध्यमिक शाळांची घोषणा व त्यासंबंधी शासन निर्णय काढणे बाकी आहे.या कामासाठी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांनी विना विलंब शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय जाहीर करावा.

तसेच शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत थकीत पगार जमा करुन वेतन देण्याची मागणी केली आहे.अशा विविध मागण्या घेऊन शिक्षक पुन्हा आंदोलनाला बसले मागण्या मान्य करा अन्यथा येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांच्या आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे. तसेच याला महाराष्ट्र शासनच पूर्णपणे जबाबदार राहील असेशिक्षक संघटना राज्य सचिव टी एम नाईकयांनी सांगितले

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.