ETV Bharat / state

paper leaked : बोर्डाच्या पेपरफुटीप्रकरणी शिक्षकाला अटक; विलेपार्ले पोलिसांची कारवाई

कोरोना कालावधीनंतर प्रथमच बारावीचे (एचएससी) विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देत आहेत. ( HSC Exam Offline ) मात्र, याच दरम्यान बारावीचा (HSC) रसायनशास्त्राचा पेपर लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी ( Vile Parle Police ) मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे. ( Private Coaching Class Teacher Arrested Malad )

mukesh yadav
मुकेश यादव
author img

By

Published : Mar 14, 2022, 3:26 PM IST

मुंबई - कोरोना कालावधीनंतर प्रथमच बारावीचे (एचएससी) विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देत आहेत. ( HSC Exam Offline ) मात्र, याच दरम्यान बारावीचा (HSC) रसायनशास्त्राचा पेपर लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी ( Vile Parle Police ) मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे. ( Private Coaching Class Teacher Arrested Malad ) या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर दिल्याची माहिती मिळाली आहे.

पोलीस अधिकारी याबाबत बोलताना

तीन विद्यार्थ्यांचीही चौकशी -

शनिवारी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर झाला. मात्र, परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पेपर पोहोचला होता. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश यादव असे हा खासगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांची चौकशीही केली आहे. पेपरलीकसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाचा हात आहे का? पेपरलीक करण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला होता का? याचाही पोलीस तपास करत आहेत.

या कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. हा शिक्षक त्या गटाशी संबंधित आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी कुठूनतरी रसायनशास्त्राचा पेपर मिळाला. त्यांनी तो पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केला. पेपर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नांची तयारी सुरू केली. अशा स्थितीत त्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. परीक्षा केंद्रावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना संशय आल्याने विद्यार्थ्यांचे स्मार्ट फोन तपासला. त्यात प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप ग्रुपवर अगोदरच फिरवण्यात आल्याचे समोर आले.

हेही वाचा - Accident On Pandharpur Road : भाविकांच्या ट्रॅक्टरला अपघात; चारजण जागीच ठार, तर 6 गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.