मुंबई - परिवहन विभागाने 1 मार्चपासून मुंबई व उपनगरातील टॅक्सी व रिक्षाचे भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टॅक्सी-रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली असून महामुंबई गुरुवारपर्यंत 14 हजार 638 रिक्षा चालकांनी मीटर रिकॅलिब्रेशन केले आहे. तर टॅक्सी चालकांनी मात्र या प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई गुरुवारपर्यंत फक्त 18 टॅक्सी चालकांनी मीटर कॅलिब्रेशन केले आहे.
12 दिवसांत 14 हजारपेक्षा रिक्षाचे रिकॅलिब्रेशन
मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये आतापर्यंत एकही रिक्षा किंवा टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन झालेले नाही. याउलट वडाळा आरटीओमध्ये 17 टॅक्सी आणि 6 हजार 668 रिक्षाचे रिकॅलिब्रेशन पार पडली आहे. तर अंधेरी आरटीओमध्येही 3 हजार 131 रिक्षाचालकांनी मीटरचे कॅलिब्रेशन करून घेतले आहे. तर बोरिवली आरटीओमध्ये 499 रिक्षा चालकांनी रिकॅलिब्रेशन करण्यात आलेले आहे. नवी मुंबई आणि पेणमध्ये रिक्षाचालकांनी आतापर्यंत रिक्षा चालकांनी मीटरचे रिकॅलिब्रेशन केलेले नाही. तर कल्याण आरटीओमध्ये मीटर कॅलिब्रेशन केलेल्या रिक्षांची संख्या 12 आहे. याउलट ठाणे आरटीओमध्ये रिक्षाचालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 3 हजार 355 रिक्षाचालकांनी कॅलिब्रेशन प्रक्रिया पार पडलेली आहे. पनवेल आरटीओ कार्यक्षेत्रात 255 रिक्षाचालकांनी कॅलिब्रेशन केले आहे.
प्रवासी दुरावण्याची भीती
परिवहन विभागाने भाडेवाढीसाठी मंजुरी दिली असली, तरी रिक्षा व टॅक्सी चालकांकडून त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नव्या दरवाढीमुळे रिक्षाचे किमान भाडे 18 रुपयांवरून 21 रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे 22 रुपयांवरून 25 रुपये झाले आहे. मात्र, दर वाढ आकारण्यास सुरुवात केल्यास नेहमीचा प्रवासी दुरावण्याची भीती टॅक्सीचालक विकास पवार यांनी व्यक्त केली आहे.
नव्या भाडेदराचा कागदी तक्ता
मुंबईतील रिक्षांची संख्या अडीच लाखाहून अधिक असून टॅक्सीची संख्या चाळीस हजारांहून अधिक आहे. मात्र, मीटरमध्ये बदल करणे अर्थात मीटर रिकॅलिब्रेशन करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या कमी आहे. मीटर अद्यावत होईपर्यंत प्रवाशांकडून नवे भाडे वसूल करण्यासाठी परिवहन विभागाने नव्या भाडेदराचा तक्ताही प्रकाशित केलेला आहे. मात्र, डिजिटल मीटर असताना कागदी तक्ता पाहून जादा भाडे देण्यास प्रवाशांकडून नकार दिला जात आहे. त्यामुळे शहरात टॅक्सी चालक आणि प्रवाशांमध्ये भाडे आकारणीवरून भांडण होण्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा - आज राज ठाकरे यांचा पुन्हा विनामास्क वावर; कारवाई होणार?
हेही वाचा - 'एनआयएने केलेली कारवाई म्हणजे मुंबई पोलिसांच्या अधिकारावर अतिक्रमण'