ETV Bharat / state

Tata Mumbai Marathon : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे काउंटडाऊन सुरू; 'या' तारखेला होणार स्पर्धा

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ( Tata Mumbai Marathon Competition ) १५ जानेवारी रविवारी रोजी मुंबईत ( Mumbai Marathon Competition ) पार पडत आहे. मागील दोन वर्ष कोरोनाचा कहर असल्याकारणाने ही स्पर्धा झाली नव्हती, त्यामुळे यंदा या स्पर्धेसाठी मुंबईकरांसोबत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटूंचा ( International runner ) उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये दिसणार आहे.

Tata Mumbai Marathon
Tata Mumbai Marathon
author img

By

Published : Jan 7, 2023, 10:09 PM IST

टाटा, मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे काउंट डाऊन सुरू

मुंबई - आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्ड लेबल' ( Gold label ) दर्जा मिळालेली १८ वी "टाटा मुंबई मॅरेथॉन" स्पर्धा ( Tata Mumbai Marathon Competition ) पुढच्या रविवारी १५ जानेवारी रोजी मुंबईत पार पडत आहे. यासाठी या मॅरेथॉनच्या ( Tata Mumbai Marathon ) आयोजकांसह संपूर्ण मुंबई ( Mumbai Marathon Competition ) सज्ज झाली आहे. यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉन शर्यतीत तब्बल ५५ हजार धावपटूंनी भाग घेतला आहे.

राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय धावपटूंचा समावेश - यंदा कडाक्याच्या थंडीत भल्यापहाटे अठरावी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या गुलाबी थंडीत धावपटूंचा उत्साह पाहण्यासारखा असणार आहे. मागील दोन वर्ष करोनाचा कहर असल्याकारणाने ही स्पर्धा झाली नव्हती, त्यामुळे यंदा या स्पर्धेसाठी मुंबईकरांसोबत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटूंचा ( International runner ) उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये दिसणार आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून होणार सुरवात - फुल मॅरेथॉनला (४२.१९५ किलोमीटर) या स्पर्धेला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिस ( Chhatrapati Shivaji Terminus ) येथून हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर हाफ मॅरेथॉन (२१.०९७ किमी) ही माहीम दर्गा, माहीम बीच येथून सुरू होणार असून त्यानंतर होणाऱ्या १० किलोमीटर रन, चॅम्पियन विकलांग रन, सीनियर सिटीजन रन व ड्रीम रन या सर्व मॅरेथॉनची सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून होणार आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग - यंदा मुंबई मॅरेथॉनमधील एलिट स्पर्धेत परदेशीं खेळाडूंमध्ये २०२० चा विजेता केनियाचा डेरारा हुरीसा याच्यासह आयेले अबशेरो, वर्कनेश अलेमु, शेला चेपकेच हे धावपटू यंदा पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुन्हा चमक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये गोपी टी,श्रीनु बुघाथा, सुधा सिंह हे धावपटू सामील होणार आहेत.

आशियातील सर्वात मोठी इनामी राशी असलेली मॅरेथॉन - टाटा मुंबई मॅरेथॉन ही आशियातील सर्वात मोठी इनामी राशी असलेली मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. एकूण तब्बल ४ लाख ५ हजार युएस डॉलर इतकी इनामी राशी या मॅरेथॉनसाठी दिली जात. एलीट पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या विजेत्याला ४५ हजार युएस डॉलर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २५ हजार युएस डॉलर तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला १७ हजार यूएस डॉलर इतकी राशी दिली जाते. त्याचबरोबर भारतीयांच्या कॅटेगिरी मध्ये पहिल्या येणाऱ्या विजेत्याला ५ लाख, दुसऱ्या विजेत्याला ४ लाख व तिसऱ्या विजेत्याला ३ लाख रुपये दिले जातात. तसेच सर्व कॅटेगिरी साठी इनामी राशी दिली जाते.

देशाची शान मुंबई मॅरेथॉन - या स्पर्धेविषयी बोलताना राज्याचे क्रीडा प्रधानसचिव रणजीत सिंह देओल यांनी सांगितले आहे की, ही मुंबई मॅरेथॉन फक्त मुंबई किंवा राज्याची नाही तर, संपूर्ण जगाची शान आहे. या मॅरेथॉनमुळे मुंबई, महाराष्ट्राचे नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असतं. त्या कारणाने ही मॅरेथॉन होण्यासाठी अधिक प्रयत्न घेतले जातात. मागील दोन वर्ष करोना कारणास्तव ही मॅरेथॉन होऊ शकली नव्हती. परंतु यंदा या मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा त्याचबरोबर या मॅरेथॉनचा प्रत्यक्षदर्शी अनुभव घेत धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या मुंबईकरांचाही उत्साह फार मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. म्हणूनच यंदा ही मॅरेथॉन पूर्ण उत्साहामध्ये पार पडेल यात शंका नाही, असेही देओल म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.