नवी मुंबई - तळोजा एमआयडीसी मधील तोंडरे गाव येथे एका कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र, या आगीत मोठया प्रमाणात वित्त हानी झाली प्राथमिक माहिती आहे.
फिनेल बनविणारी कंपनी
महाराष्ट्र इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एल 86 येथे मध्यरात्री 1 च्या सुमारास आग लागली. कंपनीत फिनेलसाठी लागणाऱ्या रॉ मटेरियलवर प्रक्रिया केली जाते. ही कंपनी मोसीन मेमू चौधरी यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. आग लागली तेव्हा कंपनीत एकूण 200 लीटर रॉ मटेरियल भरलेले 150 प्लॅस्टिक व लोखंडी ड्रम होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. मात्र, या आगीत प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
हेही वाचा-VIDEO : तरुणाला होळीमध्ये ढकलत हत्येचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा-नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंचाची गोळ्या झाडून हत्या