ETV Bharat / state

असल्फा महिला मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; किरीट सोमैया यांचे आंदोलन - किरीट सोमैया आंदोलन बातमी

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे असल्फा येथे गटारात पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. यासाठी दोषी असणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यामागणीसाठी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले.

take-action-against-the-authorities-in-case-of-asalfa-women-death-said-kirit-somaiya
असल्फा महिला मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; किरीट सोमैया यांचे मंत्रालयाबाहेर आंदोलन
author img

By

Published : Oct 16, 2020, 6:26 PM IST

घाटकोपर (मुंबई) - असल्फा येथे गटारात पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मागणीसाठी आज मंत्रालयासमोर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आंदोलन केले. यावेळी मंत्रालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. सोमैया यांची पोलिसांसोबत बाचाबाचीदेखील झाली.

मंत्रालयाबाहेरील आंदोलनादरम्यान किरीट सोमैया यांची प्रतिक्रिया

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलेला जीव गमवावा लागला असून संबंधित पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली होती. मात्र कारवाई न झाल्यामुळे आम्ही मंत्रालयाबाहेर आंदोलन करीत आहोत. यासाठी दोषी असणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करून या महिलेच्या घराच्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी किरीट सोमैया यांनी केली. आंदोलन करताना वेळेची मर्यादा असल्यामुळे पोलिसांनी किरीट सोमैया यांना ताब्यात घेतले.

काय आहे प्रकरण?

असल्फा येथून शीतल भानुशाली ही महिला बेपत्ता झाली होती. मुंबईत आलेल्या मुसळधार पावसादरम्यान गटाराचे झाकण उघडे राहून त्यात ती पडल्याची भीती वर्तविण्यात येत होती. ती बेपत्ता होण्याअगोदर दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसात ती वाहून गेल्याचा स्थानिकांचा अंदाज होता. त्यामुळे असल्फा मेट्रो खाली आणि आजू बाजूच्या परिसरात असलेल्या गटारात शोधकार्य सुरू होते. मात्र मुंबई महानगर पालिका, अग्निशमन दल आणि पोलीस यांना यश मिळाले नाही; पंरतु तीन दिवसांनी 4 ऑक्टोबर रोजी रात्री ताडदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाजी अली येथील समुद्रकिनारी महिलेचे शव आढळले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.