ETV Bharat / state

औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी आता धडक कारवाई, राजेंद्र शिंगणेंचे मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना पत्र

कोरोनाच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीव्हीर व टोसीलीझमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यभरात कारवाया वाढवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विभागाला दिले आहेत.

take Action against Black Market Medicine says rajendra shingane
राजेंद्र शिंगणेंचे मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना पत्र
author img

By

Published : Jul 25, 2020, 6:36 PM IST

मुंबई - कोरोनाच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीव्हीर व टोसीलीझमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यभरात कारवाया वाढवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विभागाला दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने आतापर्यंत मुंबई व ठाणे येथे चार प्रकरणात कारवाई केली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून जास्त तक्रारी येत आहेत. त्यामुळे याठिकाणच्या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यभर कारवाया होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलीस व गुप्तचर यंत्रणांमार्फत प्राधान्याने कारवाया करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती डॉ. शिंगणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका पत्राद्वारे केली आहे.

कमी पुरवठ्यामुळे औषध रुग्णाला वेळेवर मिळणार नाही या भीतीपोटी अगोदरच औषधाची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची जनतेच्या मनातील भीती व संभ्रम दूर करण्यासाठी राज्यस्तरावर नेमण्यात आलेल्या कोविड टास्क फोर्समार्फत रेमडेसीव्हीर व टोसीलीझमॅब ही औषधे रुग्णाचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर कोणत्या दिवशी व कोणत्या परिस्थीतीत द्यावीत, तसेच ही दोन्ही औषधे एकाच वेळी रुग्णांना देता येतात का? याबाबत राज्यातील जनतेला मार्गदर्शन व्हावे. यासाठी कोविड टास्क फोर्सला उचित निर्देश देण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीव्हीर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझमॅब (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. या औषधांच्या वापराबाबत कोविड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचे मत, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे. या आशयाची मागणी करणारे पत्र त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे. या पत्रात डॉ. शिंगणे यांनी लिहिले आहे की, कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर आणि टोसीलीझमॅब या औषधांच्या वापराबद्दल सध्या संभ्रम आहे. या औषधाची मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित असल्याने तुटवडा भासत आहे. रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांसाठी या दोन्ही औषधांची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी ही औषधे जास्त प्रमाणात प्रिस्क्राईब केली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. कोविड रिपोर्ट येण्यापुर्वी किंवा रिपोर्ट आल्यानंतर पहिल्या दिवशीच ही औषधे प्रिस्क्राईब केलेली किंवा एकाच प्रिस्क्रीपशन वर दोन्ही औषधे मागवलेली असल्याची माहिती मिळाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.