मुंबई : अभिनेता जितेंद्र जोशी व दिग्दर्शक निखिल महाजन यांनी साकारलेला गोदावरी हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात (tailor of film Godavari was lodged in Mumbai) प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टेलर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मुंबईत लॉज करण्यात आला. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी गोदावरी म्हणजे आपली जीवनदायिनी असून; गोदावरीशी नाते सांगणारा हा चित्रपट असल्याचं सांगितलं आहे.
प्रमुख भूमिकेत अभिनेता जितेंद्र जोशी : आजच्या आधुनिक काळातही गोदावरी नदीच्या काठीशी असलेले जुने नाशिक शहर वर्षानुवर्षे चालत आलेल्या आपल्या रूढी परंपरांना काहीसे सांभाळून असल्याचे दिसून येते.गोदावरीची गोष्ट ही जुन्या नाशकातल्या अशाच एका कुटुंबाची आहे. वडिलोपार्जित चालत आलेल्या व्यवसायाची जबाबदारी बळजबरीने सोपवली गेल्यामुळे आयुष्याकडे नकारात्मक रित्या पाहणाऱ्या तरुणाची म्हणजेच निशिकांत देशमुखची आहे. सततची होणारी चिडचिड, भांडण, नाखुशी याचा नकळत आपल्या जवळच्या व्यक्तीवर आणि नातेसंबंधावर होणाऱ्या परिणामामुळे कुटुंबापासून दूर गेलेल्या निशिकांतच्या आयुष्यात अशी काही अनपेक्षित बातमी येते की, ज्याने त्याचा जगण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. निशिकांतची प्रमुख भूमिका अभिनेता जितेंद्र जोशी यांनी साकारली आहे.
वेगळा ठसा उमटवेल : या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ११ नोव्हेंबर रोजी
गोदावरीशी नाते सांगणारा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. याअगोदर अनेक पुरस्कार या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर भेटलेले आहेत. आज आपल्या मराठी चित्रपटाचा आशय व दर्जा उच्च आहे. ऋग्वेद मध्ये सुद्धा नदिशी संवाद राहिला आहे. आज आमचे विचार, संस्कार, जीवन प्रदूषित झाले आहे. यात अंधश्रद्धा नाही आहे. या गोदावरी नदी भोवती एका व्यक्तीची कहाणी गुंफून नदीशी असलेले नाते सांगितले आहे. मी हा चित्रपट पूर्ण बघणार. आपल्या करता गोदावरी जीवनदायनी आहे. आपल्या सर्वांवर आपल्या नद्या जपण्याची जबाबदारी आहे. आज नद्यांचे प्रदूषण हे १० टक्के कंपन्यातील रासायनिक पाण्यामुळे व ९० टक्के प्रदूषण मलनिःसारण यामुळे होत आहे. हा चित्रपट लोकांच्या मनावर वेगळा ठसा उमटवेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.