ETV Bharat / state

Swami Dayananda Saraswati Jayanti : महर्षी दयानंद सरस्वती यांची आज जयंती ; एक नजर त्यांच्या जीवनकार्यावर

author img

By

Published : Feb 12, 2023, 8:41 AM IST

समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांची आज जयंती आहे. त्यांनी तत्कालीन प्रचलित सामाजिक विषमतेशी लढण्यासाठी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती. आर्य समाजाने सामाजिक सुधारणा आणि शिक्षणावर भर देऊन देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

Swami Dayananda Saraswati Jayanti
दयानंद सरस्वती यांची आज जयंती

मुंबई : देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 12 फेब्रुवारीची तारीख महत्त्वाची आहे. संपूर्ण जग आजचा दिवस स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती म्हणून साजरी करते. महर्षी दयानंद सरस्वती यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८२४ रोजी झाला होता. महर्षी दयानंद सरस्वती एक समाजसुधारक होते. त्यांनी कोणाच्याही विरोधाची आणि निषेधाची पर्वा न करता हिंदू समाजाला नवसंजीवनी देणे, हे आपले ध्येय बनवले होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केवळ धार्मिक क्रांतीच केली नाही, तर गुलामगिरीत अडकलेल्या देशाला मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय क्रांतीचा बिगुल देखील वाजवला होता.

दयानंद सरस्वतींचा जीवनप्रवास : महर्षी दयानंद सरस्वती यांचा जन्म टंकारा, गुजरात येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णाजी लालजी तिवारी आणि आईचे नाव यशोदाबाई होते. त्यांचे वडील ब्राह्मण कुटुंबातील एक श्रीमंत, संपन्न आणि प्रभावशाली व्यक्ती होते. ते कर-वसुलीचा व्यवसाय करत होते. दयानंद सरस्वती यांचे खरे नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते. त्यांचे सुरुवातीचे जीवन अतिशय आरामदायी होते. पुढे ते संस्कृत, वेद, शास्त्रे आणि इतर धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासात गुंतले.

1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना : स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये गिरगावात आर्य समाजाची स्थापना केली होती. आर्यसमाजाचे नियम व तत्त्वे सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी आहेत. त्यांनी वेदांचा अधिकार नेहमीच सर्वोच्च मानला. स्वामीजींनी कर्म सिद्धांत, पुनर्जन्म, ब्रह्मचर्य आणि त्याग या तत्त्वज्ञानाचा मुख्य आधार बनवला होता. त्यांनी 1876 मध्ये पहिल्यांदा स्वराज्याचा नारा दिला होता. तो पुढे लोकमान्य टिळकांनी पुढे नेला. सत्यार्थ प्रकाश यांच्या लेखनात भक्ती ज्ञानाव्यतिरिक्त त्यांनी समाजाच्या नैतिक उन्नतीवर आणि सामाजिक सुधारणांवर त्यांनी भर दिला. समाजातील ढोंगीपणा, उद्धटपणा, क्रूरता, अनाचार, दिखाऊपणा, स्त्री अत्याचार यांचा निषेध करण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. धर्माच्या क्षेत्रात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा, कुप्रथा आणि फसवणुकीला त्यांनी विरोध केला.

'संन्यासी योद्धा' : स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून समाजसुधारणेची अनेक कामे केली. त्यांनी अस्पृश्यता, सती प्रथा, बालविवाह, मानवी बलिदान, धार्मिक संकुचितता आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला आणि विधवा विवाह, धार्मिक औदार्य आणि परस्पर बंधुत्वाला पाठिंबा दिला. वेदांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना 'संन्यासी योद्धा' म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा : Today Cryptocurrency Price: पाहा क्रिप्टोकरन्सीत कोणती गुंतवणुक राहील फायदेशीर? जाणून घ्या आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.