ETV Bharat / state

Committed Suicide : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीने अकरा वर्षांच्या मुलीची हत्या करून केली आत्महत्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन निर्दयी बापाने 11 वर्षांच्या मुलीची हत्या करून केली स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Committed Suicide
Committed Suicide
author img

By

Published : Apr 26, 2023, 7:53 PM IST

मुंबई : लालबागमध्ये गेल्या महिन्यातच पोटच्या मुलीने आपल्या आईचे तुकडे तुकडे करून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. त्यानंतर काळाचौकी पोलिसांनी रिम्पल जैन या मुलीला अटक केली होती. त्यानंतर आता लालबागमधील प्रसिद्ध अशा गणेश गल्लीतील पोस्ट ऑफिसमागे असलेल्या जिजाभाई लेन येथे हत्येची घटना उघडकीस आली आहे. विमावाला हाऊस या इमारतीत पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरुन आज सकाळी बापाने आपल्या पोटच्या ११ वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यामुळे लालबाग परिसरात खळबळ उडाली आहे.

सुसाईड नोटमध्ये लिहले धक्कादायक कारण : भूपेश पवार यांच्या लॉकरमध्ये काळाचौकी पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून या सुसाईड नोटमध्ये ९ ते १० तोळे सोने, ९ लाख रुपये माझ्या भाच्याला द्या. तसेच माझं घर, प्रॉपर्टी माझ्या भावाला द्या. पत्नीला माझ्या संपत्तीतील काहीही देऊ नका, असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे या सुसाईड नोटमध्ये ११ वर्षीय मुलीची हत्या करण्याचे कारण देखील भूपेश पवार यांनी लिहिले आहे. माझ्या मागे म्हणजेच माझ्या पश्चात माझ्या मुलीकडी दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी मुलीला संपवून स्वतःला आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी काल रात्री भूपेश यांचे त्यांच्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणात मोबाईल देखील खाली फेकून दिला होता. तो शेजाऱ्यांनी घरी आणून दिला होता.

मुलीची हत्या नंतर केली आत्मह्त्या : लालबाग येथील गणेश गल्ली येथे मंगळवारी एका ४२ वर्षीय व्यक्तीने आपल्या ११ वर्षीय मुलीची हत्या करून गळफास लावून घेतला. भूपेश पवार असे या व्यक्तीचे नाव असून मुलीचे नाव आर्या असे आहे. मृत व्यक्तीची पत्नी त्याला फोनवर सकाळी कॉल करत होती. जेव्हा तिचा कॉल अनुत्तरित येत होता. तेव्हा तिने कामावरून घर गाठले असता दोघेही मृत अवस्थेत दिसले. पत्नीच्या त्रासामुळे हे पाऊल उचलत असल्याचे मृताने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. ही घटना विमावाला हाऊस येथील रुम क्रमांक 16 मध्ये घडली. भूपेश पवार (४२) हा स्टॉक ब्रोकर असून त्याची पत्नी भाग्यश्री (३८) आणि आर्यासोबत राहत होता. मंगळवारी सकाळी 10 वाजता भाग्यश्री तिच्या घराजवळ एका खाजगी फर्ममध्ये डीटीपी ऑपरेटर म्हणुन नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सकाळी 11 च्या सुमारास तिने तिच्या पतीला फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने उत्तर दिले नाही. त्यानंतर तिने घरी धाव घेतली. दरवाजा आतून बंद केलेला आढळला. तिने शेजाऱ्यांना कळवले. त्यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ इमारतीचा दरवाजा तोडला. त्यावेळी भूपेश, मुलगी पंख्याला लटकलेले दिसले. पोलिसांनी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे पोहोचताच दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.

पत्नीशी भांडण झाल्यामुळे आत्महत्या : इमारतीतील रहिवासी हेमराज परब सांगितले की, आम्ही सर्वजण कुटुंबाला चांगले ओळखत होतो, विशेषत: वडील, मुलगी यांच्याशी बोलणं व्हायचे . ते नेहमी हसतमुख, आनंदी असत. आदल्या रात्री, भूपेश, मी पुढच्या आठवड्यात आम्ही इमारतीत होणाऱ्या पूजेबद्दल बोललो. काळाचौकी पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'या हत्या आणि आत्महत्येबाबत नेमके कारण समजून घेण्यासाठी आम्ही सुसाईड नोटचा अभ्यास करत आहोत.' एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भूपेशने पत्नीशी भांडण झाल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.

हेही वाचा - Naxalite attack in Dantewada : दंतेवाडात नक्षलवाद्यांचा हल्ला, IED स्फोटात 11 जवान शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.