ETV Bharat / state

मानवी तस्करीचा संशय असलेले विमान मुंबईत परतले, २७५ प्रवाशांची चार दिवसानंतर फ्रान्समधून सुटका

गेली चार दिवस अमेरिकेत अडकलेले शेकडो भारतीय प्रवाशी आज मुंबईत परतले आहेत. फ्रान्समध्ये अडकलेले विमान आज पहाटे 4 वाजता मुंबईत पोहोचलयं.

suspected human trafficking case
suspected human trafficking case
author img

By PTI

Published : Dec 26, 2023, 7:15 AM IST

Updated : Dec 26, 2023, 12:26 PM IST

मुंबई- 276 प्रवाशांना घेऊन चार्टर विमान आज पहाटे मुंबईत दाखल झालं. या विमानात बहुतांश प्रवाशी भारतीय आहेत. गेली चार दिवस या विमानातील प्रवाशी मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये अडकले होते. सुटका झाल्यानंतर विमानातील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

एअरबस ए 340 हे विमान आज पहाटे 4 वाजता मुंबईत उतरले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 च्या सुमारास पॅरिसजवळील व्हॅट्री विमानतळावरून विमानानं मुंबईच्या दिशेनं उड्डाण केलं होते. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर विमानात 276 प्रवासी होते. दोन अल्पवयीन मुलांसह 25 जणांनी फ्रान्समध्ये आश्रय घेण्याची इच्छा व्यक्त केली. ते अजूनही फ्रान्समध्ये आहेत. दोघांना फ्रान्समधील न्यायलायात हजर करण्यात आलं. त्यानंतर साक्षीदाराच्या अर्जावर सोडून दिल्याचं एका फ्रान्स वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे.

  • Maharastra | Plane with Indian passengers, that was grounded in France over suspected human trafficking lands in Mumbai.

    — ANI (@ANI) December 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निकाराग्वा या ठिकाणी होते मानवी तस्करीअमेरिकेतील निकाराग्वा या ठिकाणी मानवी तस्करीचं प्रमाण अधिक आहे. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर पेट्रोल (CBP) च्या आकडेवारीनुसार, 2023 या आर्थिक वर्षात तब्बल 96 हजार 917 भारतीयांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. हे प्रमाण 2023 च्या तुलनेत 51.61 अधिक आहे. 2023 मध्ये किमान 41,770 भारतीयांनी मेक्सिकन भू सीमेवरून अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

  • #WATCH | Maharashtra: Passengers leave from Mumbai airport.

    A plane with Indian passengers that was grounded in France for four days over suspected human trafficking arrived in Mumbai, earlier today. pic.twitter.com/N93wPcbwr8

    — ANI (@ANI) December 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • भारतामधून निघालेले विमान व्हॅट्री विमानतळावर उतरल्यानंतर तेव्हा विमानात 303 भारतीय प्रवाशी होते. तर 11 अल्पवयीन प्रवाशी होते. स्थानिक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार फ्रान्समध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी मेकशिफ्ट बेडची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना शौचालय आणि अंघोळीची सुविधा मिळू शकली आहे.
  • प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता व्हॅट्री विमानतळाच्या हॉलमध्ये प्रवाशांना जेवण आणि गरम पेय देण्यात आल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. हे विमान रोमानियन चार्टर कंपनी लीजेंड एअरलाइन्सचे होते. ते निकाराग्वे जात असताना तांत्रिक कारणासाठी गुरुवारी व्हॅट्री येथे उतरलं होते. फ्रान्समधील पोलिसांना मानवी तस्करीचा संशय आल्यानंतर तपास करण्यात आला.

हेही वाचा-

Last Updated : Dec 26, 2023, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.