मुंबई Sushma Andhare On Devendra Fadnavis : हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी विरोधकांनी विविध मुद्द्यावर आक्रमक होत विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. तर पहिल्याच दिवशी सत्ताधा-यांनी विरोधकांना बॅकफूटवर ढकलल्याचं चित्र पाहायला मिळालं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी (Disha Salian Case) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश गृह विभागाने दिलेत, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत असताना, दुसरीकडे सभागृहात नवाब मलिक यांच्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
दानवे-फडणवीस यांच्यात खडाजंगी : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात देखील विरोधक आक्रमक होत, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला आणि ज्यांना तुरुंगात पाठवले. तेच आज नवाब मलिक (Nawab Malik) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तुमच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मग मविआ सरकारच्या काळामध्ये ते मंत्री असताना त्यांचा राजीनामा तुम्ही का घेतला नाही? असा पलटवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला. यामुळं सभागृहात गदारोळ झाला. फडणवीस यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
देवेंद्रभाऊ, पूजा चव्हाण या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप संजय राठोंडवर तुम्हीच केला होता. त्यानंतर तुमच्याच पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर आता नवाब मलिक यांच्या बाबतीतही तेच करत आहात. देवेंद्रभाऊ, सरडे सुद्धा लाजून आत्महत्या करतील. एवढे आपण रंग आणि भूमिका बदलत आहात - सुषमा अंधारे, ठाकरे गटाच्या उपनेत्या
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा अंधारे यांना टोला : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार, नवाब मलिक यांच्यावरून आज विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. नवाब मलिक यांच्या बाबत दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराला सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना उत्तर देत, 'सरडा सुद्धा आत्महत्या करेल' असा टोला लगावला आहे. सुषमा अंधारे यांच्या वाक्याचा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भरपूर समाचार घेत त्यांना सडेतोड उत्तर देत, 'मातोश्रीवर जास्त चकरा मारू नका, नाहीतर तेथील सरडे सुद्धा आत्महत्या करतील' असा टोला लगावला आहे.
सुषमाताई….तुमच्या बाबतीत तर कित्येक सरडे दररोज आत्महत्या करतात. हिंदू देवी-देवतांबद्दल घाणेरडी विधाने करणे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची टिंगल उडविणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बद्दल तुम्ही केलेली विधाने विसरलात की काय? आणि आज तुम्ही त्यांचेच गोडवे गाताय, मान्य आहे. मातोश्रीभोवती असे सरडे नियमित फिरत असतात. फार मातोश्रीवर चकरा मारु नका,नाहीतर तेथील सरडेही आत्महत्या करतील - चित्रा वाघ भाजपा, महिला प्रदेशाध्यक्ष
हेही वाचा -
- Cabinet Meeting In Marathwada : संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोट्यवधींचा चुराडा
- Sushma Andhare On CM Shinde : एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद कधीही जाणार, भाजपचा काही नेम नाही : सुषमा अंधारे
- Sushma Andhare On Fadnavis : 'त्या' प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही - सुषमा अंधारे