ETV Bharat / state

“जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, अजित पवार गटाची आव्हाडांवर जहरी टीका - आमदार रोहित पवार

Suraj Chavan On Jitendra Awhad : अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत आहेत. अजित पवार यांच्याबद्दल वक्तव्य करुन ते प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ‘दादा मला माफ कर’ असं म्हणायची वेळ त्यांच्यावर येईल, असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Suraj Chavan On Jitendra Awhad
Suraj Chavan On Jitendra Awhad
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 7:28 PM IST

सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई Suraj Chavan On Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय तसंच निवडणूक आयोग सुनावणी करत आहे. दुसरीकडं राष्ट्रवादीच्या दोन गटात शाब्दिक चकमक सुरू आहे. अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शरद पवार गटाच्या दोन आमदारांवर जहरी टीका केली आहे.

आव्हाड राजकारणातील राखी सावंत : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यावर अजित पवारांचा गट देखील प्रत्युत्तर देत आहे. जितेंद्र आव्हाड प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्यं करत असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला आहे. अभिनेत्री राखी सावंत आपल्या वक्तव्यानं जशी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करून जितेंद्र आव्हाड चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.

रोहित पवारांची यात्रा नसून जत्रा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील तरुणांच्या प्रश्नासंदर्भात युवा संघर्ष यात्रा सुरू केली. युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीचं कर्तव्य असून त्याकडं दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला होता. रोहित पवार यांच्या युवा संघर्षाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा शरद पवार गटातील नेते करत आहेत. दुसरीकडं रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा जत्रा असल्याची टीका होत आहे. रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नक्कल असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्याची कुवत काय - विकास लवांडे : अजित पवार गटात सूरज चव्हाण यांची ताकद काय? त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणं बोलावं, त्यांच्यासारखे दीडशे तरुण त्यांच्यावर बोलायला तयार आहेत. आम्हाला त्यावर बोलण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच, रुपाली चाकणकरांचा दावा
  2. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक बॅकफूटवर, सत्ताधाऱ्यांची 'ही' खेळी चर्चेत
  3. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार करणार मदत, देवेंद्र फडणवीसांचं अधिवेशनात आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.