ETV Bharat / state

Sharad Pawar death threat : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी...काही घडले तर गृहमंत्रालय जबाबदार-सुप्रिया सुळे - शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले, की शरद पवार यांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाने दखल घ्यावी. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. सोयीनुसार गुप्तचर यंत्रणाचे अपयश असल्याची त्यांनी टीका केली.

Sharad Pawar death threat
शरद पवार जीवे मारण्याची धमकी
author img

By

Published : Jun 9, 2023, 10:58 AM IST

Updated : Jun 9, 2023, 1:26 PM IST

राज्यात गुंडगिरी व दडपशाहीचे राज्य

मुंबई: गेली काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यात तणावाची स्थिती असताना चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. तुमचा दाभोळकर करू अशी शरद पवारांना 'ट्विटवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीरपणे दखल घेत मुंबई पोलीस आयुक्ताकंडे केली तक्रार केली आहे. जर काही घडले तर त्यासाठी सरकार जबाबदार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले. वेबसाईटवरूनही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाचे घाणेरडे राजकारण बंद व्हावे, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनाही व्हॉट्सअपवर धमकी मिळाली आहे. गृहमंत्र्यांनी पाठपुरावा घेऊन कारवाई करावी, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी मागणी करणार आहे. राज्यात दडपशाही व गुंडगिरीचे राज्य आहे. शरद पवारांना धमकी देणाऱ्या ट्विटवर खूप कॉमेंट आहेत. त्यामधून द्वेष कुठे व कशासाठी पसरविला जात आहे? त्यामागे अदृश्य हात कोणता, हे तपासणे गरजेचे आहे.-खासदार सुप्रिया सुळे

काही घडले तर देशाचे,राज्याचे गृहमंत्री जबाबदारराजकारणात मतभेद असू शकतात. इतका द्वेष ज्या पद्धतीने समाजात पसरला जातो अतिशय दुर्दैवी आहे. प्रसार माध्यमातून बातमी बघितली सोलापूरमध्ये एक मुलगा दोन मुली बरोबर कॉफी पीत होत. तेथे त्याचे प्रोफेसर आले तेही कॉफी घेत होते. त्याच वेळी काही मुलं तिथे आली आणि त्या मुलाला भरपूर मारले. मुलाला काही न विचारता अशा प्रकारे मारणे ही कुठली दडपशाही, गुंडाराज आहे? काय सुरू आहे? सोलापूरसारख्या ठिकाणी दोन मुली, एक मुलगा आणि प्रोफेसर कॉफी पिऊ शकत नसेल तर हे प्रशासनाचे अपयश आहे. हिम्मतच कसे होते की दुसऱ्याच्या मुलाला अशा प्रकारे मारायचे. एक महिला आणि देशाची नागरिक म्हणून मला गृहमंत्र्यांनी न्याय द्याव्या जर काही घडले तर त्याला सर्व जबाबदार देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री असतील, असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट

संयमाचे शरद पवारांनी केले होते आवाहन: राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दंगली घडल्यानंतर शरद पवार यांनी लोकांना नुकतेच शांततेचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य असल्याने अशा घटना लौकिकास शोभणाऱ्या नसल्याचे पवार यांनी म्हटले. जाणीवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न असल्याचा आरोपही पवारांनी केला होता. याची किंमत सामान्य माणसालाच भोगावी लागत असल्याने याची काळजी घ्या असे पवार यांनी म्हटले. कोणी चुकीचे वागत असेल पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घ्यावी, असेही शरद पवारांनी आवाहन केले.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह? गेली काही दिवस आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर, बीड, अहमदनगर या ठिकाणी तणावाची स्थिती उद्धभवली होती. त्यामुळे राज्याती कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षांच्या नेत्याकडून प्रश्न उपस्थित होत आहे. या दंगली जाणीवपूर्वक व निवडणुकीत यश मिळविण्यासाठी घडवून आणल्या जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. अशातच भाजपचे नेते निलेश राणे यांनी शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म असल्याची ट्विट करत टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आज जेलभर आंदोलन करण्यात येणार आहे.

हेही वाचा-

  1. Sharad Pawar on Riots: दंगलींमधून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न- शरद पवार
  2. Sharad Pawar on Politics : जनतेने इंदिरा गांधी सारख्या जबरदस्त नेत्यांचाही पराभव केला होता - शरद पवार
  3. Maharashtra Politics: औरंगाबाद शहराच्या नामांतरणाबाबत महाविकास आघाडीत मतभेद, पहा दोन्ही नेते काय म्हणाले...
  4. Nilesh Rane vs Sharad pawar : निलेश राणेंकडून शरद पवारांची तुलना; अमोल मिटकरींनी दिले सणसणीत उत्तर

Last Updated : Jun 9, 2023, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.