ETV Bharat / state

'हायपरलूप प्रकल्प डिजनी लँडमध्येच चांगला दिसतो', सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

सोमवारी पार पडलेल्या बैठकीत संसदेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासह खासदारांची समिती नेमण्याबाबत सहमती झाल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली. खासदार अरविंद सावंत यांची या समितीच्या समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jan 28, 2020, 8:35 AM IST

Updated : Jan 28, 2020, 10:21 AM IST

मुंबई - 'मुंबई-पुणे हायपरलूपसारखा प्रकल्प जगात कुठल्याही देशात कार्यरत नाही. १७ मिनिटात मुंबईहून पुण्याला जाणे, हा आधीच्या सरकारचा कदाचित चुकलेला प्रकल्प असेल. काही प्रकल्प डिजनी लँडमध्येच चांगले दिसतात', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. महाराष्ट्रात एसटी, उपनगर रेल्वेसह सध्या सुरू असलेले मेट्रोचे प्रकल्प हे प्राधान्याचे विषय आहेत. अनेक प्रकल्प प्रलंबित असताना महागडा हायपरलूप प्रकल्प कशासाठी, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सोमवारी पार पडलेल्या बैठकीत संसदेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासह खासदारांची समिती नेमण्याबाबत सहमती झाल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार अरविंद सावंत यांची समितीचे समन्वयक म्हणून नेमण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार; गिरीश महाजनांचा सरकारला इशारा

हेही वाचा - मामाच ठरला कर्दनकाळ, चार वर्षाच्या भाच्याची हत्या

यावेळी सुप्रिया सुळेंनी गायक अदनान सामींना मिळालेल्या 'पद्मश्री' पुरस्कारावरही भाष्य केले. जनतेच्या मनात असलेल्या कलाकारांना जनता पुरस्कार देते, त्यामध्ये राजकारण नको, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Intro:Body:mh_mum_adnam_sami_Supriya_sule_mumbai_7204684
supriya sule byte with live 3G

जेवायला नाही मग पुरण पोळी का वाढता? - खासदार सुप्रिया सुळे यांचे हायपरलूप प्रकल्पावर टिका

मुंबई:मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पासारखा प्रकल्प जगात कुठल्याही देशात कार्यरत नाही; सतरा मिनिटात मुंबई वरून पुण्याला जाणे हा आधीच्या सरकारचा कदाचित चुकलेला प्रकल्प असेल. महाराष्ट्र मध्ये एसटी,उपनगरी रेल्वे सध्या सुरू असलेले मेट्रोचा प्रकल्प हे प्राधान्याचे विषय असला पाहिजे. अनेक गरजेचे पायाभूत प्रकल्प प्रलंबित असताना महागडा हायपुरलुप प्रकल्प कशासाठी माझा प्रश्न आहे? असे
काही प्रकल्प डिजनीलैंड मध्ये चांगले दिसतात असा टोला त्यांनी लगावला.
केंद्राकडे प्रलंबित असलेले राज्याच्या विकास प्रकल्पांचे निधीतून प्राथमिक मिळावेत अशी मागणी आजच्या बैठकीत केली. खासदारांनी आपापल्या भागातील प्रश्नांची बैठकीत मांडणी केली. संसदेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यावरही बैठकीत सहमती झाली.
असो सुप्रिया सुळे म्हणाल्या.
केंद्राकडे प्रलंबित राज्याचे प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी खासदारांची समिती नेमणार. विषयनिहाय गट करून कसोशीने पाठपुरावा करणार. खासदार अरविंद सावंत समितीचे समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे.
अदनाम सामी ला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला असे माझ्या वाचनात आले. जनतेच्या मनात असलेल्या कलाकारांना जनता पुरस्कार देते त्यामध्ये राजकारण नको असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.Conclusion:
Last Updated : Jan 28, 2020, 10:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.