ETV Bharat / state

शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार सक्रिय; सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ केला शेअर - सुप्रिया सुळे शरद पवार व्हिडिओ बातमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती मंगळवारी सायंकाळी अचानक बिघडली. पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर ३० मार्चला रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Apr 1, 2021, 10:14 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 30 मार्चला रात्री शस्त्रक्रिया झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुप्रिया सुळे यांनी पवारांचा वर्तमान पत्र वाचतानाचा फोटो शेअर केला होता. आज देखील सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णालयात वृत्तपत्र वाचून शरद पवार महाराष्ट्राचा आढावा घेताना दिसत आहेत.

शरद पवार यांच्यावर लॅप्रोस्कोपी ही शस्रक्रिया पार पडली. अर्धा तास ही शस्रक्रिया चालली. या शास्त्रक्रियेनंतर शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, पोटाला थोडी सूज आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. पुढील चार ते पाच दिवसांनी गॉल ब्लॅडरची आणखी एक शस्रक्रिया केली जाणार आहे. २९ मार्चला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य तपासणीत पवार यांना मूत्राशयाचा आजार जडल्याचे निष्पन्न झाले होते.

मुश्रीफ आणि राणेंनी घेतली भेट -

काल(बुधवारी) सकाळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. खासदार नारायण राणे त्यांच्या पत्नी आणि नितेश राणे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर भेट घेऊन आल्यानंतर शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती.

यांनी केली पवारांच्या प्रकृतीची विचारपूस -

शरद पवारांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजपातील केंद्रीय नेत्यांनी देखील फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गानसाम्राज्ञी लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर, माजी मंत्री सुरेश प्रभू, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आशिष शेलार, कमलनाथ, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्वांचे शरद पवारांनी ट्विट करून आभार मानले आहेत.

हेही वाचा - शरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर; सुप्रिया सुळेंनी मानले डॉक्टरांचे आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.