ETV Bharat / state

सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न पुरस्काराच्या मानकरी - टी एस कृष्णमूर्ती

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि इ-मॅगेझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

supriya sule became parliament maharatna for the second time
सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 12:37 PM IST

मुंबई Supriya Sule News : विद्यमान सतराव्या लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 17 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना हा पुरस्कार दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या संकल्पनेतून पुरस्काराला सुरुवात : चेन्नई मधील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगेझीनच्या वतीनं दरवर्षी संसदेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खासदारांना संसद महारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून या पुरस्काराला सुरुवात झाली आहे. खासदारांची लोकसभेतील उपस्थिती, लोकसभेतील चर्चेत नोंदवलेला सहभाग तसंच खासगी विधेयक आणि अनुकरणीय उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

यामुळं मिळाला पुरस्कार : विद्यमान सतराव्या लोकसभा सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांनी 96% उपस्थिती लावली असून 152 चर्चा सत्रांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलाय. तसंच सुळे यांनी 1186 प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत, तर 22 खासगी विधेयकं मांडलीय. ज्यूरी कमिटीचे चेअरमन, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि भारतीय निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस कृष्णमूर्ती यांनी सुप्रिया सुळेंची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यापूर्वी याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सातवेळा प्रदान करण्यात आलाय.

कामाची पावती : या पुरस्कारासाठी आपली निवड ही जनतेसाठी केलेल्या कामाची पावती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेनं ज्या विश्वासानं आपल्याला संसदेत पाठवलंय तो विश्वास आपण सार्थ ठरवण्यास कायम तत्पर राहू, म्हणून हा पुरस्कार बारामती मतदारसंघातील जनतेला कृतज्ञापूर्वक अर्पण करत असताना मला आनंद होत आहे, अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या.

हेही वाचा -

  1. लोकसभा आणि विधानसभेचे विषय वेगळे, निकालाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नाही - सुप्रिया सुळे
  2. छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीत बोलावं, 'खोके' सरकारमध्ये स्पष्टता नाही - सुप्रिया सुळे
  3. विधानसभा निवडणूक 2023 ; पाच राज्यातील निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडं लोकांचा कल असल्याचं केलं स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.