मुंबई - शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज सकाळी ११ वाजता निकाल देण्यास सुरुवात करणार आहे. याची माहिती खुद्द सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी बुधवारी जाहीर केली. न्यायालयाचे संपूर्ण कामकाज हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर लाईव्ह दिसू शकणार आहे.
सत्तासंघर्षातील प्रकरणांची आजपर्यंत सुनावणी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमार झाली. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार असल्याने हे प्रकरण लवकर निकाली काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती.
या' निकालाने आमदारांसह सरकारचे ठरणार भवितव्य- एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर या आमदारांवर अपत्रातेची टांगती तलवार आहे. या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे. जूनमध्ये, मुख्यमंत्री शिंदे आणि ३९ आमदारांनी शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केले. परिणामी पक्ष फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपने अचानक मुख्यमंत्री पद दिले.
लोकशाहीसाठी महत्त्वाचा निकाल असेल-हा निकाल भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेसाठी महत्त्वाचा ठरेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले. या निकालामुळे राज्यघटना मजबूत होईल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देशाचे भवितव्य ठरवणार आहे. देशात लोकशाही आहे का? कायदेमंडळे संविधानानुसार कार्यरत आहेत, न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे कार्यरत आहे का, हे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठरवेल. आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. मला विश्वास आहे की देशाचे सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे, असे राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुका लढविणार आहोत. पुढील सरकार देखील शिवसेना-भाजप युतीच स्थापन करणार आहे. आम्ही एकत्रितपणे लोकसभेच्या ४८ जागा जिंकू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-
Political Crisis In Maharashtra : राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर नाना पटोले यांचे मोठे विधान
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
Maharashtra political Crisis: सत्तासंघर्षावर उद्या निकाल, महाविकास आघाडीची भूमिका काय?