मुंबई - महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या 'ऑल फूड अॅन्ड ड्रग्स लायसन्स फेडरेशन'ने औषध पुरवठा बंद केलेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी औषध पुरवठा केला आहे. परंतु त्या बदल्यात त्यांना सरकारने पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे 60 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने त्यांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.
'ऑल फूड अॅन्ड ड्रग्स लायसन्स फेडरेशन' हे महाराष्ट्रातील १७ वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात औषध पुरवठा करतात. तसेच राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात देखील औषध पुरवठा करतात, यामुळे लाखो रुग्णांना याचा फायदा होतो. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पुरवठा धारकांनी औषध पुरवठा केलेला आहे. मात्र, त्यांना त्याचे पैसे देण्यात आलेले नाहीत. सरकारने त्यांचे ६० कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे ते आता औषध देखील घेऊ शकत नाहीत आणि पुरवठा देखील करू शकत नाहीत. त्यांच्या फेडरेशन मधील सर्वच औषध पुरवठा करणारे मालक हे कर्जबाजारी झालेले आहेत. तर, सरकार गेल्या कित्येक दिवसांपासून थकलेले पैसे देत नसल्याने त्यांनी औषध पुरवठा बंद केलेला आहे. त्यामुळे लाखो रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.
तुमची औषधे बोगस आणि गैर-
गेल्या अनेक दिवसांपासून या औषध पुरवठा करणाऱ्या लोकांचे पैसे थकलेले आहेत. त्यामुळे या फेडरेशनने रुग्णालयांना औषध पुरवठा केला नाही तर, रुग्णांना उपचार मिळणार नाही. त्याबाबत फेडरेशनने शासकीय रुग्णालयाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी संजय मुखर्जी यांची भेट घेतली. त्यावेळेस मुखर्जी यांनी या फेडरेशनच्या सर्व सभासदांना सांगितले, तुम्ही जो औषध पुरवठा केलेला आहे. तो गैर आहे, बोगस आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हे ऐकून सर्व औषध पुरवठा करणारे सभासद अवाक् झाले. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून औषध पुरवठा केलेला असून पैसे आज येतील उद्या येतील या आशेवर पुरवठा धारक होते. मात्र, हे अचानक अस ऐकल्यानंतर पुरवठाधारक चकित झाले.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी फेर निवड, तर मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढांवर कायम
जीआरमध्ये 10 टक्क्यांच्यावर अधिक औषध पुरवठा कोणत्याही पुरवठादारांकडून करून घेऊ नये, अशी तरतूद मुखर्जी यांनी पुरवठा धारकांना सांगितली. हे याअगोदर पुरवठा धारकांना माहीत नव्हते, असे पुरवठा धारकांनी सांगितले. त्यांनी रुग्णालयाचे डीन आणि अधिकारी यांच्या म्हणण्यावर रुग्णालयात औषध पुरवठा केला. त्यांना हा जीआर माहीत असताना देखील त्यांनी पुरवठा धारकांना सांगितलेलं नाही. आमचे पैसे आम्हाला परत द्यावे आणि अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी पुरवठाधारकांनी मुखर्जी यांना केली. तसेच आम्ही पुरवठा बंद करत आहोत असेही सांगितले.
आपले पैसे मिळावे, आपल्यासोबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत त्यांनी मुंबई पोलिसांना जाऊन याबाबत पत्रव्यवहार केला. यापुढे शासकीय रुग्णालयांना आम्ही औषध पुरवठा करणार नाही, असा निर्णय घेतला. याप्रकरणी 'ईटीव्ही भारत'नी फेडरेशनच्या अध्यक्ष अभय पांडे यांच्याशी बातचीत केली.
हेही वाचा - मनोरुग्णाने घेतला पोलिसाच्या बोटाचा चावा; नागपाड्यातील घटना