ETV Bharat / state

Sunny Leone Item Song : आता सनी लिओनी थिरकरणार माधुरी दीक्षितच्या गाण्यावर, वाचा सविस्तर - Madhuri Dixit

Sunny Leone Item Song : माधुरी दीक्षितच्या गाण्यावर सनी लिओनी आयटम सॉंग करणार आहे. कोणतं गाणं आहे, ते केव्हा प्रदर्शित होणार याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

Sunny Leone Item Song
माधुरी दीक्षित सनी लिओनी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 6:33 PM IST

मुंबई Sunny Leone Item Song : गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटात 'आयटम सॉंग' असणं गरजेचं बनलेलं दिसतंय. त्यातच आता या आयटम सॉंग्समध्ये आघाडीच्या अभिनेत्री दिसत आहेत. आयटम सॉंग प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी बनविण्यात येतं. बऱ्याचदा अशा गाण्यांमुळं चित्रपटाला प्रसिद्धी मिळते. त्याचा चांगला परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून येत असतो. अशा 'तडका' लावलेल्या गाण्यामुळे थिएटर्समध्ये शिट्या टाळ्या वाजत असतात. माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, करीना कपूर खान, बिपाशा बासू, कतरीना कैफ यासारख्या अनेक तारकांनी चित्रपटांमध्ये आयटम नंबर्स केले आहेत. आता सनी लिओनी एका ढासू आयटम नंबरमध्ये दिसणार आहे. माधुरी दीक्षितच्या एका गाजलेल्या गाण्यावर ती थिरकताना दिसणार आहे. (Sunny Leone item song on Madhuri Dixit song)

गाण्यांचा रिमेक : हिंदी चित्रपटांमध्ये रिमेक सॉंग्स हा ट्रेंड रुजताना दिसतोय. जुन्या गाजलेल्या गाण्यांना आधुनिकतेनं पुनरुज्जीवित करत गाण्यांचा रिमेक होताना दिसतोय. आँख मारे, तम्मा तम्मा, मुकाबला, सावन में लग गयी आग, तसंच नुकतंच प्रदर्शित झालेल्या जवानमधील रमैय्या वस्तावैय्या सारखी अनेक गाणी रसिकांनी उचलून धरली आहेत. त्यामुळे गाजलेल्या गाण्यांना नवीन स्वरूपात प्रेक्षक स्वीकारताना दिसत आहेत. या ट्रेंडला अनुसरूनच एका नवीन चित्रपटात माधुरी दीक्षितच्या एका गाजलेल्या गाण्यावर सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. (Sunny Leone on Madhuri Dixit song)

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला : माधुरी दीक्षितचे आजही असंख्य चाहते आहेत. तसंच सनी लिओनीचाही चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळं जेव्हा सनी लिओनी माधुरी दीक्षितच्या गाण्यावर थिरकताना दिसेल, तेव्हा ते गाणं सुपरहिट ठरणार यात शंकाच नाही. अर्थातच या गाण्याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या आयटम नंबरमध्ये सनीचं सादरीकरण कसं असेल, याबद्दलही कुतुहल आहे. बॉलीवूड सेन्सेशन सनी लिओनीच्या नृत्याबाबत या चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलंय की, सनी लिओनी तिच्या नृत्य अष्टपैलुत्वासाठी ओळखली जाते. माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक डान्स नंबरला तिच्याकडून मानवंदना देण्यात येणार आहे. साहजिकच हे गाणं पडद्यावर आग लावणारं ठरेल. (Madhuri Dixit song)

सर्वस्तरीय प्रशंसा : सनी लिओनी अभिनित आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित केनेडी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये वाहवाही मिळवतोय. त्यातील चार्लीच्या भूमिकेसाठी सनी लिओनीला सर्वस्तरीय प्रशंसा मिळतेय. केनेडी लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. तसंच सनी लिओनी आगामी तमिळ चित्रपट 'कोटेशन गँग'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. पाहा: बिग बॉस ओटीटीच्या घराला सनी लिओनीची भेट
  2. पाहा : सनी लिओनसह बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री कॅमेऱ्यात झाल्या कैद
  3. पाहा: सारा अली आईसोबत मालदिवला रवाना, सनी लिओनी, तमन्ना कॅमेऱ्यात कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.