ETV Bharat / state

Sunil Tatkare On INDIA: आपण 'इंडिया माता' म्हणत नाही... सुनील तटकरेंचा विरोधी पक्षांच्या नेत्यांवर निशाणा - इंडिया शब्द बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार

Sunil Tatkare On INDIA : मोदी सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. बोलविण्यात आलेलं संसदेचं विशेष अधिवेशनाचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, याबाबत तर्कवितर्क लावले जातं आहे. भाजपा विरोधातील सर्वच पक्षानी एकत्रित इंडिया आघाडी स्थापना केली. विशेष अधिवेशनात विधेयक आणून इंडिया शब्द बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळं या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका स्पष्ट करण्यास सुरुवात केलीय.

Sunil Tatkare On INDIA
सुनील तटकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 10:19 PM IST

सुनील तटकरे यांचा माध्यमांशी संवाद

मुंबई Sunil Tatkare On INDIA : शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. कार्यक्रमानंतर बोलवण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशन संदर्भात सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी ते म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण 'भारत माता की जय' असा नारा दिलाय. देशातील प्रत्येक नागरिक 'भारत माता' असा असा उच्चार करतात. आपण कधीही 'इंडिया माता' असं म्हणालो नाही. त्यामुळं इंडियाच्या आघाडीची स्थापना केलेल्या लोकांना भारतवर बोलण्याचा अधिकार नसल्याचं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीला टोला लगावलाय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय बोललं, त्याविषयी आपण उत्तर देणार नसल्याचंही ते सांगायला विसरले नाही. पहिल्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. ओबीसी आरक्षण अबाधित ठेवूनच मराठा आरक्षण दिलं पाहिजे. 2 जुलै रोजी INDIA मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपासोबत जाण्याचा निर्णय वरीष्ठ नेत्याने बसून घेतलाय. निवडणूक आयोग आमच्या निर्णयावर शिककामोर्तब करंल, अशी आशा असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश : 'शिवसंग्राम संघटने"च्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. यावेळी 20 जिल्ह्यातील संघठना पदाधिकारी यांनी प्रवेश केलाय. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे उपस्थित होते. (INDIA Word change Bill)

इंडिया आघाडीची बैठक : मोदी सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलाविले आहे. अधिवेशनात सहभागी व्हायचं की नाही, याबाबत आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षांचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवास्थानी इंडिया आघाडीची बैठक (India Alliance meeting) संपन्न झालीय. या विशेष अधिवेशनात मणिपूरबाबत चर्चा आणि चीन, लडाखमधील घुसखोरी यावर चर्चा करणार असेल तर अधिवेशन फलदायी ठरेल. आम्ही त्यांना पाठींबा देऊ. मात्र, तुमच्या प्रचारासाठी हा खेळ असेल तर त्या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल, असंही ते म्हणाले आहेत. अधिवेशनाच्या अजेंडाबाबत कोणतीही कल्पना सदस्यांना देण्यात आली नाही. अधिवेशन काळात फोटोसेशन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याला उत्तर देतांना राऊत म्हणले की, याचा अर्थ असा आहे की, ते लोकसभा बरखास्त करू शकतात. (Sunil Tatkare )

हेही वाचा :

  1. Amit Shah On INDIA Alliance : इंडिया आघाडीकडून 'सनातन धर्माचा' अपमान -अमित शाह
  2. INDIA Meeting : 'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी
  3. Amitabh Bachchan Tweets : 'इंडिया' 'भारत' वादात महानायकाची उडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.