ETV Bharat / state

Suicide in Kandivali : उधार मालाचे पैसे न मिळाल्याने कांदिवलीत एका व्यक्तीची आत्महत्या; आरोपीला अटक - कांदिवलीत एका व्यक्तीची आत्महत्या आरोपीला अटक

उधार मालाचे पैसे न मिळाल्याने कांदिवलीत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. ही घटना उत्तर मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. ( Suicide in Kandivali ) ओमप्रकाश स्वामी असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. १० मार्चला ओमप्रकाश स्वामीने आत्महत्या केली. यानंतर आरोपीला १९ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. ( Railway Police on Kandivali Sucide )

Suicide in Kandivali, accused arrested by railway police
कांदिवलीत एका व्यक्तीची आत्महत्या आरोपीला अटक
author img

By

Published : Feb 23, 2022, 6:39 PM IST

मुंबई - उधार मालाचे पैसे न मिळाल्याने कांदिवलीत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. ही घटना उत्तर मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. ( Suicide in Kandivali ) ओमप्रकाश स्वामी असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. १० मार्चला ओमप्रकाश स्वामीने आत्महत्या केली. यानंतर आरोपीला १९ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. ( Railway Police on Kandivali Sucide )

ओमप्रकाश होता तणावाखाली -

ओमप्रकाश स्वामीने आरोपी चिनप्पा रेड्डी याला ८२ लाख रुपयांचा माल उधार दिला होता. आरोपी चिनप्पा रेड्डी हा कपड्यांचा व्यवसाय करतो आणि विष्णू ट्रेड नावाची कंपनी चालवतो. मात्र, बराच वेळ होऊनही चिनप्पा रेड्डी यांनी ओमप्रकाश स्वामी यांना पैसे परत केले नाहीत. त्यामुळे ओमप्रकाश खूप तणावाखाली होता. अखेर वैतागून ओमप्रकाश यांनी १० मार्च २०२१ रोजी आत्महत्येचे शेवटचे पाऊल उचलले.

चिनप्पा रेड्डीचा शोध सुरू -

त्याचवेळी आत्महत्येदरम्यान ओमप्रकाश यांनी चिनप्पाच्या विरोधात लिहिलेली सुसाईड नोट खिशात ठेवली होती. या सुसाईड नोटमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. सुसाईड नोटमध्ये ओमप्रकाश यांनी चिनप्पावर सामानाचे पैसे परत न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी चिनप्पा रेड्डीचा शोध सुरू केला. यानंतर १९ फेब्रुवारी २०२२ला चिनप्पाला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. चिनप्पा आपल्या मृत नातेवाईकाच्या १२व्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याच्या गावी पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस तेथे पोहोचले. आणि आरोपी चिनप्पाला अटक करण्यात आली.

हेही वाचा - Kangana Ranaut summoned : कंगना रणौतला समन्स, भटिंडा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.