मुंबई Suicide Attempt In Ministry : मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज समोर आलीय. अहमदनगर जिल्ह्यातील जांभळी मोहोळ येथील रहिवासी असलेले रणजीत बाबासाहेब आव्हाड हे शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. (Suicide Attempt In Ministry of Contract Teacher)
शासकीय नोकरीची मागणी : रंजीत आव्हाड हे मूळ आंबेजोगाई येथील रहिवासी आहे. 1975 मध्ये पाझर तलावासाठी शासनानं त्यांची जमीन संपादित केलेली आहे. या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही सदस्याला अद्यापपर्यंत शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आलेलं नाही. गेल्या तीन पिढ्यांपासून केवळ शासनाकडून आश्वासने दिली जात आहेत. अद्यापपर्यंत कोणालाही नोकरी दिली नाही. त्यामुळे आळंदी येथे एका वारकरी शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून काम करीत असलेल्या रणजीत आव्हाड यांनी शासकीय नोकरी कायम करावं, या मागणीसाठी वारंवार मंत्रालयात फेऱ्या मारल्या. मात्र कुणीही दखल घेत नसल्यानं अखेर आपण हा मार्ग स्वीकारत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलंय.
पोलिसांनी घेतलंय ताब्यात : मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून रणजीत आव्हाड यांनी आत्महत्या करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यावेळेस मंत्रालयात उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलंय. अधिक चौकशीसाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेलं आहे. (Suicide Attempt)
यापूर्वीची घटना : यावर्षी मार्च महिन्यात देखील अशीच एक घटना घडलीय. मंत्रालयासमोर तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत एकाचा मृत्यू झालाय. या घटनेत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोघींनी किटकनाशक प्राशन करून तर, एका अपंग बांधवाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मागील वर्षी देखील एका तरूणानं असाच प्रयत्न केला होता. त्या तरुणानं मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या प्रेयसीवर तीन वर्षापूर्वी अतिप्रसंग झाला होता. त्याला न्याय मिळत नसल्यानं त्यानं हे पाऊल उचललं होतं.
हेही वाचा :
- Amravati Crime: अमरावती हादरलं! सासू आणि मेहुण्याची जाळून हत्या केल्यावर जावयाची आत्महत्या
- Kota Student Suicide : विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोटाच्या कोचिंग सेंटरवर गुन्हा दाखल
- Maratha Youth Suicide Nanded: आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या तरुणाची आत्महत्या, प्रश्न निकाली काढण्याची मराठा सकल समाजाची मागणी