ETV Bharat / state

'राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा; जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवावी'

राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे, असे राज्याचे अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवावी, असेही ते म्हणाले.

dr. rajendra shingane, minister
डॉ. राजेंद्र शिंगणे, मंत्री
author img

By

Published : Sep 14, 2020, 5:19 PM IST

मुंबई - राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यास त्यादृष्टीने नियोजन करून ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय येथे आज (सोमवारी) ऑक्सिजन तयार करणारे उत्पादक, पुरवठादार आणि वाहतुकदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे ऑक्सिजन पुरवठा करताना आवश्यक असणारी यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित राहा,वी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. शिंगणे यांनी यावेळी केले. या वेळी अन्न व औषध प्रशासन सचिव विजय सौरभ, आयुक्त अरुण उन्हाळे, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, राज्यातील 11 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता पडते आहे. याचे प्रमाण सुमारे 500 मेट्रिक टन एवढे आहे तर सध्या एक हजारपेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. तरीही काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतुकदार यांनी आपले वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करावे आणि गरजूंपर्यंत ऑक्सिजन पोहचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास शासनातर्फे अडचण दूर करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी ऑक्सिजन पुरवठ्यासह मास्कच्या किमती, सॅनिटायझरची उपलब्धता, रेमडेसवीर आणि इतर औषधे तसेच खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध असलेला ऑक्सिजनचा साठा याचाही डॉ. शिंगणे यांनी सविस्तर आढावा घेतला.

नियंत्रणासाठी विशेष कंट्रोल रुम -

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष कंट्रोल रुम स्थापन केली आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपली मागणी नोंदवितात. जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सिजन तातडीने त्या जिल्ह्याला उपलब्ध करुन दिले जाते. या कंट्रोल रुममध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी 1800222365 तसेच 02226592364 हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.