मुंबई Sudhir More Committed Suicide : घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर सुधीर मोरे यांचा मृतदेह शनिवारी आढळला होता. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. एक महिला सुधीर मोरेंना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर येतेय. ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीनं सुधीर मोरेंना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलंय का? याप्रकरणी सखोल तपास कुर्ला रेल्वे पोलीस करत आहेत.
रात्री उशिरा फोन आला : घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वे रुळावर गुरुवारी रात्री सुधीर मोरे यांचा मृतदेह सापडला होता. रात्री त्यांना घरी असताना एक फोन आला होता. मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे, असं आपल्या खासगी सुरक्षा रक्षकाला सांगून ते घाई गडबडीत घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकाला आपल्यासोबत नेणं टाळलं होतं. स्वतःची गाडी न घेता ते रिक्षानं गेले. घाटकोपर आणि विद्याविहारच्या मधोमध असलेल्या पुलाखाली रात्री साडे अकराच्या दरम्यान रुळावर झोपले. त्यावेळी कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं पाहून लोकलचा वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, दुर्दैवाने वेगात असलेली लोकल ट्रेन सुधीर मोरे यांच्या अंगावरुन गेली. जागीच त्यांच्या शरीराचे तुकडे होऊन मृत्यू (Sudhir More suicide in Ghatkopar) झाला.
तपास प्राथमिक टप्प्यावर : गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना एक महिला ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतंय. त्या अनुषंगाने रेल्वे पोलीस आता तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॅार्ड करण्यासाठी मोरे यांनी एक नवीन मोबाईल फोन देखील घेतला होता. हा मोबाईल कुर्ला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलाय. कुर्ला रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केलाय. मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग आणि सीडीआरद्वारे तपास सुरू करण्यात आलाय. ब्लॅकमेलिंग केल्याने आत्महत्या केलीय का? याचा तपास कुर्ला रेल्वे पोलीस करत आहेत. कुर्ला रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, सध्या तपास प्राथमिक टप्प्यावर आहे. सुधीर मोरे यांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. तसेच सुधीर मोरे यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मोरे सतत फोनवर : पोलीस तपासावेळी सुधीर मोरे यांच्या निकटवर्तीयांनी नोंदवलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आलीय. याशिवाय, गुरुवारी रात्री घाटकोपर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सुधीर मोरे शेवटपर्यंत सतत फोनवर बोलत असल्याचं स्पष्ट झालंय. ते फोनवर 'त्या' महिलोसोबतच बोलत असावेत, असा संशय पोलिसांनी वर्तवलाय. सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. ते मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईटचे शिवसेनेचे नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे माजी विभागप्रमुखही होते. त्यांची वहिनीदेखील माजी नगरसेविका होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरे गटासोबतच राहिले होते. (Sudhir More suicide)
हेही वाचा :
- Sudhir More Dead Body Found In Mumbai : उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; सुधीर मोरे यांची रेल्वेपुढं आत्महत्या?
- Mumbai suicide: धक्कादायक! वडील फक्त ओरडले; 16 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल
- Nanavare Couple Suicide Case: ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; आरोपीला पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी