मुंबई : मुंबईतील जे.जे. रुग्णालय ( J J Hospital ) परिसरात असणाऱ्या डी.एम. पेटीट नावाच्या साधारण १३० वर्षे जुन्या इमारतीमध्ये एक ब्रिटिशकालीन भुयार सापडले आहे. बुधवारी रुग्णालय परिसराची पाहाणी करत असताना निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांना संशयास्पद गोष्टीचा अंदाज ( Doubtful things are predicted to local authorities ) आला. त्यानंतर त्यांनी कुतूहलाचा भाग म्हणून तिथे असणारे झाकण काढण्याचा प्रयत्न केला. झाकण निघताच तिथे काहीशी पोकळी असल्याचे त्यांना जाणवले. सदर भाग हा नर्सिंग क़ॉलेजचा आहे. पण, तिथे सापडलेल्या या भुयारामुळे आता अनेकांचीच उत्सुकता आणि कुतूहल शिगेला पोहोचली आहे.
जे जे रुग्णालयात भुयार : मुंबईतील जे.जे. रुग्णालय परिसरात बुधवारी पाहणी करत असताना निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांना संशयास्पद झाकण आढळून आले. झाकण निघताच तिथं काहीशी पोकळी असल्याचे जाणवले. त्वरित सुरक्षा रक्षकांना बोलावून त्या जागेची पाहणी करण्यात आली तेव्हा तिथे भुयार असल्याचे समोर आले. या भुयाराची लांबी 200 मीटर आहे. जे जे रुग्णालयाकडून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला भुयाराबाबत कळवण्यात आले आहे. हे भुयार डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली आहे. सर जे जे रुग्णालयाची वास्तू ब्रिटीशकालीन आहे. त्यातच आता सापडलेले भुयार पाहता आता मुंबई जिल्हाधिराऱ्यांकडे यासंदर्भातील माहिती सोपवण्यात आली आहे.
येथेही भुयार सापडली : मुंबईत अशा प्रकारचं भुयार सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी काही वर्षांपूर्वी सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरातही भुयार सापडले होते. त्यानंतर आता जे जे रुग्णालयात भुयार सापडले आहे. काही वर्षांपूर्वी राज्याचे राज्यपाल यांचे निवासस्थान असलेल्या राजभवन मध्ये भुयार सापडले होते. मुंबईतील किल्ल्यांमध्ये अशीच भुयार आढळून आली आहेत.
177 वर्षे जुने जे जे रुग्णालय : सर जे जे रुग्णालयाच्या इमारती 177 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या. सर जमशेदजी जिजीभॉय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने या इमारती उभारण्यात आल्या आहेत. 16 मार्च 1838 रोजी जमशेदजी जिजीभॉय यांनी या वास्तूच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर 30 मार्च 1843 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजची पायाभरणी झाली. तर 15 मे 1845 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जिजीभॉय रुग्णालय वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी खुले झाले होते.
भुयार साधारणत २०० मीटर लांब : हे भुयार सापडल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या सहाय्यानं पुढील पाहणी केली आणि तिथे असणाऱ्या भुयाराचा थांगपत्ता लागला. जे जे रुग्णालयाकडून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला भुयाराबाबत कळवण्यात आले. हे भुयार साधारणत २०० मीटर लांब असून, इमारतीचं आयुर्मान पाहता ते १३० वर्षे जुने असल्याचे सांगण्यात आले आहे. हे भुयार डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
१७७ वर्षापूर्वीचा इतिहास : सर जे जे रुग्णालयाच्या इमारती १७७ वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या. सर जमशेदजी जिजीभॉय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने या इमारती उभारण्यात आल्या आहेत. १६ मार्च १८३८ रोजी जमशेदजी जिजीभॉय यांनी या वास्तूच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर ३० मार्च १८४३ रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजची पायाभरणी झाली. तर १५ मे १८४५ रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जिजीभॉय रुग्णालय वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी खुले झाले होते.काही वर्षांपूर्वी सेंट जॉर्ज परिसरातही असंच भुयार सापडलं होतं. मुंबईत अशा प्रकारचं भुयार सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीची शहरातील काही भागांतून भुयारं, चोरवाटा सापडल्या आहेत. या भूयाराची माहिती मुंबई जिल्हाधिकारी यांना देण्यात आली असून पुढील माहिती घेण्याचे काम सुरू आहे.