ETV Bharat / state

उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होई नये, यासाठी कामगार ब्युरोची स्थापना करणार - सुभाष देसाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर हे त्यांच्या राज्यात निघून गेले. मात्र, त्यांच्या जाण्याने राज्यात आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे, ती स्थानिक भूमीपुत्रांनी सोडू नये, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई
उद्योगमंत्री सुभाष देसाई
author img

By

Published : May 14, 2020, 3:04 PM IST

Updated : May 14, 2020, 3:48 PM IST

मुंबई - उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार आहे. अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई माहिती देताना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कारखान्यातील परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी निघून गेले आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी निर्माण झाली आहेत. यासाठी कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असून यात कामगारांच्या त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. त्यानंतर, अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. मराठी मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले आहे.

कोरोनामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही गेले महिनाभर परप्रांतीय मजुरांना सतत सांगत होतो जाऊ नका. तरीही, ते गेले. मात्र, त्यांच्या जाण्याने राज्यात आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे, ती स्थानिक भूमीपुत्रांनी सोडू नये. कारण, त्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली. महाराष्ट्राला ही एक संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी स्थानिक भूमीपुत्रांना प्रथम संधी द्यावी. यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रातील बेकारी कमी होईल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : May 14, 2020, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.