ETV Bharat / state

Satellites Launch On Shiv Jayanti : पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गगनभरारी, उपग्रह रॉकेटद्वारा सब ऑर्बिटमध्ये सोडणार - Satellites Launch

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील दोन उपग्रह बनवले आहेत. उपग्रह येत्या शिवजयंतीला चेन्नईच्या कपट्टी पुरम येथील कल्पकम ऍटोमिक सेंटरमधून रॉकेटद्वारे आकाशात सोडले जाणार आहेत. यासाठी शाळेतील विद्यार्थी विमानाने उद्या चेन्नईला रवाना होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 16, 2023, 10:17 PM IST

Satellites Launch On Shiv Jayanti

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता नसते असे, नेहमी बोलले जाते. मात्र, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी गेल्याच महिन्यात पुणे येथे दोन उपग्रह बनवले आहेत. हे उपग्रह येत्या शिवजयंती दिनी (१९ फेब्रुवारीला) चेन्नई येथील कपट्टी पुरम येथील कल्पकम ऍटोमिक सेंटर येथून रॉकेटद्वारा सोडले जाणार आहेत. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी त्यासाठी १७ फेब्रुवारीला विमानाने चेन्नईला रावण होणार आहेत. पालिका शाळां मधील विद्यार्थ्यांची गगनभरारीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

एपीजे SLV 20 - 23 हे मिशन : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन ही संस्था स्वतः माजी राष्ट्रपती कलाम यांनी स्थापन केली होती. बाल वैज्ञानिकांची निर्मिती, लहान मुले, विद्यार्थ्यांमधील टॅलेंट शोधून त्यांना प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे काम आहे. ही संस्था भारतासह १४ देशात कार्यरत आहे. सध्या या संस्थेच्या माध्यमातून एपीजे SLV 20 - 23 हे मिशन राबवले जात आहे. या मिशनच्या अंतर्गत १५० उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. स्पेस झोन ऑफ इंडिया चेन्नई यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी लागणार सर्व खर्च तामिळनाडू मधील मार्टिन ही कंपनी सर्व खर्च उचलत आहे.

पालिका शाळेतील २० विद्यार्थ्यांना निमंत्रण : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन या संस्थेने २१ जानेवारीला पुणे, परभणी, नागपूर येथे कार्यशाळा आयोजित केली होती. पुणे येथे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन उपग्रह (सॅटेलाईट) बनवले आहेत. पालिका शाळेतील २० विद्यार्थ्यांना १८ व १९ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे रॉकेट बनवण्याच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे. अशी, माहिती पालिकेच्या गुरु गोविंद सिंग मराठी महापालिका शाळेच्या शिक्षिका व या उपक्रमाच्या मुंबईमधील प्रमुख रंजना पाटील यांनी दिली.

१५० उपग्रह सब ऑर्बिटमध्ये सोडणार : येत्या १८ व १९ फेब्रुवारी रोजी चेन्नई कपट्टीपुरम येथील कल्पकम ऍटोमिक सेंटर येथून एकाच वेळी विद्यार्थ्यांनी बनवलेले सुमारे १५० उपग्रह सब ऑर्बिटमध्ये सोडले जाणार आहेत. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात एक विद्यार्थी या उपग्रहांची आणि रॉकेटची पाहणी करणार आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे पणतू छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील त्यानंतर हे १५० उपग्रह रॉकेटच्या माध्यमातून सब ऑर्बिटमध्ये सोडले जाणार आहेत असे रंजना पाटील यांनी सांगितले.

रॉकेट पुन्हा वापरता येणार : शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून स्पेस झोन इंडियाने पुढाकार घेतला आहे. रॉकेट सब ऑर्बिटमध्ये सोडण्यासाठी संस्थेने केंद्र सरकारकडून लागणाऱ्या ५३ परवानग्या घेतल्या आहेत. चेन्नई येथील कपट्टीपुरम येथील कल्पकम ऍटोमिक सेंटर येथून सोडले जाणाऱ्या रॉकेटची किंमत ३ कोटी रुपये इतकी आहे. हे रॉकेट उपग्रह सब ऑर्बिटमध्ये सोडून आल्यावर पुन्हा वापरता येणार आहे. अशा प्रकारचे रॉकेट बनवण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करावा म्हणून मिशन : सॅटेलाईटचे कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये असते. विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करावा म्हणून हे मिशन आहे. या मिशन दरम्यान विद्यार्थ्यांना स्वतः सॅटेलाइट बनवायला मिळाले. सॅटेलाइट अवकाशात सोडण्यासाठी जे रॉकेट लागते ते सुद्धा विद्यार्थ्यानी बनवले आहे. सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये गेल्यावर तेथून ऑक्सिजन, ओझोन हे किती प्रमाणात आहे. आदी माहिती पृथ्वीवर कशी पाठवली जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना होणार आहे. सॅटेलाइट सब ऑर्बिटमध्ये १० ते २५ किलोमिटरमध्ये सोडण्यास आम्हाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे अशी, माहिती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे मिलिंद चौधरी यांनी दिली आहे.

हेही वाचा - Rename Osmanabad : उस्मानाबादचे नाव बदलण्यास केंद्राचा हिरवा कंदील, औरंगाबाद मात्र प्रतीक्षेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.