मुंबई - कोरोनामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना एक गोष्ट कळली की जीवनात ‘नाती’ खूप महत्वाची आहेत. रक्ताच्या नात्यांसोबतच ‘मैत्रीचे’ नातेसुद्धा महत्त्वाचे असते. जीवनातील प्रवास कधी-कधी खडतर असू शकतो. कधी काय घडेल सांगता येत नाही. जिवलग मित्र सोबत असतो तेव्हा कधीच कोणत्याच गोष्टीची भिती वाटत नाही. मित्रांच्या मदतीने या खडतर प्रवासामधून मार्ग काढणे सोपे जाते. सध्याच्या काळात जगभरात अनिश्चिततेचे वातावरण असताना मित्रांसोबत व्हिडिओ कॉलवर तुम्हाला वाटणारी भिती सांगितली आणि गप्पागोष्टी केल्या तर काहीसे हायसे वाटते. अशाच प्रकारच्या मैत्रीवर 'ख्वाबों के परिंदे' या सिरीजचं कथानक गुंफण्यात आलं आहे. मेलबर्न ते पर्थपर्यंतची रोड ट्रिप कशाप्रकारे बिंदीया, दिक्षित, मेघा व तुषारच्या जीवनांमध्ये बदल घडवून आणते आणि ते कशाप्रकारे त्यांच्या भावना व्यक्त करतात, वेदनांना दूर करतात, प्रेमात पडतात आणि त्यांच्या सर्वात भयंकर भितीचे शमन करतात हे या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियामधील नयनरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलेली सिरीज 'ख्वाबों के परिंदे' मधील तीन प्रमुख पात्रे, बिंदीया, दिक्षित व मेघा यांच्या जीवनाच्या अवतीभोवती फिरते. युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अतिउत्साही बिंदीया तिचे दोन सर्वात विश्वसनीय मित्र, दिक्षित व मेघाला तिच्यासोबत मेलबर्नपासून पर्थपर्यंत महत्त्वाकांक्षी व विलक्षण रोड ट्रिपवर घेऊन जाते. ही ट्रिप प्रत्येकासाठी खूपच खास असते, कारण या प्रवासामधून त्यांना स्वत:चा पुनर्शोध घेण्याची आणि एकमेकांचे प्रामाणिक सहयोगी बनण्याची संधी मिळते. त्यांच्या प्रवासादरम्यान ते हसतमुख आणि विनोदी आकाशला भेटतात.
या सिरीजबाबत अभिनेत्री आशा नेगी म्हणाली, "ख्वाबों के परिंदे ही सिरिज जीवनाबाबत असल्यामुळे ती आपल्या सर्वांशी अत्यंत संबंधित आहे. आपले मित्र जीवनाच्या सर्वात खडतर टप्प्यांमधून बाहेर पडण्यामध्ये कशाप्रकारे मदत करतात हे दाखविण्यात आले आहे. तसेच आजीवन अशी मैत्री टिकून ठेवण्याचे महत्त्व या सिरीजमधून पाहायला मिळते. माझ्या मित्रमैत्रिणींनी मला माझ्यामधील सर्वोत्तम गुणांना बाहेर आणण्यामध्ये, तसेच प्रगतीपथावर आणण्यामध्ये मदत केली आहे. तसेच माझे सह-कलाकार मृणाल, मानसी व तुषार हे देखील माझे चांगले मित्र बनले आहेत, ज्यांच्यासोबत मी आजीवन मैत्री ठेवेन.''
मृणाल दत्त म्हणाला, ''या सिरीजसाठी शूटिंग माझ्यामधील कलाकार व पर्यटक यासाठी अत्यंत सुंदर अनुभव होता. आम्ही प्रवास करत शूटिंग करत होतो, तरूण टीमसोबत ऑस्ट्रेलियाच्या नयनरम्य ठिकाणी प्रवास केला. या टीममध्ये लवकरच दृढ मैत्री झाली आणि आम्ही एकत्र चित्रपटामधील पात्रांच्या प्रवासासह वास्तविक प्रवासाचा आनंद घेतला. ही सर्वोत्तम भावी जीवनाशी संबंधित सिरीज आहे आणि मला खात्री आहे की, युवा या सिरीजशी संलग्न होतील. तुम्ही ही सिरीज तुमच्या मित्रांसोबत पाहा. मला खात्री आहे, प्रेक्षकांना या सिरीजमधील अनेक घटना पाहून त्यांच्या जीवनात देखील अशाप्रकारचे क्षण घडले आहेत असे वाटेल.''
मानसी मोघे म्हणाली, '''ख्वाबों के परिंदे' ही सुरेख व साधी कथा असण्यासोबत आजच्या तरूणांशी संबंधित आहे आणि ही कथा प्रेक्षकांशी संलग्न होईल. ही सिरीज तुम्हाला मित्र कशाप्रकारे तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य बनू शकतात, चांगल्या क्षणांना व्यतित करू शकतात आणि खडतर काळामध्ये साह्य करू शकतात या बाबींना दाखवते. या सिरीजसाठी काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अद्भुत होता. मी आशा करते की, प्रेक्षकदेखील ही सिरीज पाहण्याचा आनंद घेतील. तपस्वी व टीमने ऑस्ट्रेलियाच्या नयनरम्य ठिकाणांना सुरेखरित्या कॅप्चर केले आहे, म्हणूनच व्हिज्युअल्स व कथेच्या मूडमध्ये सुसंगतपणा आला.''
अशा नेगी पुढे म्हणाली, ''मी टेलिव्हिजनवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा बिंदीयाची भूमिका पूर्णत: वेगळी आहे. मी पटकथा वाचली तेव्हा मला समजले की, माझ्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक आहे. पण दिग्दर्शक तपस्वी यांचे आभार, त्यांच्यामुळेच हा प्रवास अत्यंत सुलभ राहिला आहे आणि त्यांनी मला बिंदीयाच्या भूमिकेमध्ये सामावून जाण्यामध्ये मदत केली.''
तुषार शर्मा म्हणाला, ''माझी भूमिका आकाश हा वैविध्यपूर्ण, विलक्षण व बेपर्वा आहे. त्याचा अनपेक्षित स्वभाव त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने आनंद होत आहे. या भूमिकेमुळे मला अनेक भावना व्यक्त करण्यास मिळाल्या. 'ख्वाबों के परिंदे' अत्यंत संपन्न अनुभव देणारी सिरीज ठरली. या सिरीजमुळे मला माझ्या जीवनातील दोन अत्यंत महत्त्वाचे पैलू एकत्रित आनंद घेण्यास मिळाले, ते म्हणजे अभिनय आणि पर्यटन. मी आशा करतो की, प्रेक्षक आमची सिरीज पाहण्याचा आनंद घेतील आणि ते त्यांच्या मित्रांसोबत काही सर्वोत्तम आठवणी निर्माण करतील.''
आपल्या भूमिकेबद्दल मृणाल दत्त पुढे म्हणाला, "सुरूवातीला दिक्षितची भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते, कारण माझे व त्याचे व्यक्तिमत्त्व पूर्णत: वेगळे होते. तसेच तपस्वी यांना दिक्षित विशिष्ट पद्धतीने सादर करायचा होता, ज्यामुळे आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. माझ्या भूमिकेसाठी तयारी करण्याचा अनुभव उत्तम होता आणि यासाठी मी दिग्दर्शक तपस्वी यांचे खूप आभार मानतो. आम्ही दिक्षितवर काम करण्यासाठी एकत्र भरपूर वेळ व्यतित केला. त्यानंतर अद्भुत सुसंगतपणा पाहायला मिळाला."
तपस्वी मेहता दिग्दर्शित वूटवरील नवीन सहा भागांच्या ओरिजिनल सिरीज 'ख्वाबों के परिंदे' मध्ये आशा नेगी, मृणाल दत्त, मानसी मोघे आणि तुषार शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. ही बहुप्रतिक्षित ड्रामा सिरीज १४ जून २०२१ पासून ‘वूट’ वर पाहायला मिळणार आहे.
मैत्री, आशा व जीवनाचा पुनर्शोध घेण्याचा रोमांचपूर्ण प्रवास अनुभवा 'ख्वाबों के परिंदे' मधून! - मानसी मोघेल न्यूज
मेलबर्न ते पर्थपर्यंतची रोड ट्रिप कशाप्रकारे बिंदीया, दिक्षित, मेघा व तुषारच्या जीवनांमध्ये बदल घडवून आणते आणि ते कशाप्रकारे त्यांच्या भावना व्यक्त करतात, वेदनांना दूर करतात, प्रेमात पडतात आणि त्यांच्या सर्वात भयंकर भितीचे शमन करतात हे या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.