मुंबई - आज मंत्रालयात संभाजी भिडे भीमा कोरेगाव केस मधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व यांनी महिला पत्रकाराला तू कपाळावर कुंकू लावला नाही टिकली लावली नाही म्हणून तिला अपमानित केले
या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोग वतीने घेण्यात आली आहे आणि नियमानुसार संभाजी भिडे यांना त्वरित नोटीस पाठवलेली आहे. तर महिला अधिकाराच्या चळवळीतील महिला अभ्यासक आणि नेत्या यांनी टीकेची झोड उठवलेली आहे.
भिडे यांनी असे बोलणे हे अपमानास्पद - पत्रकार असलेल्या महिलेने संभाजी भिडे यांना काही प्रश्न विचारला असता, संभाजी भिडे यांनी त्या महिला पत्रकाराने कपाळावर कुंकू लावलेला नाही किंवा टिकली लावलेले नाही या कारणास्तव सार्वजनिक रित्या अपमानित केल्याची घटना आज मंत्रालयात घडली. पत्रकाराला दस्तूर खुद्द वादग्रस्त आणि आरोपी असलेल्या संभाजी भिडे यांनी असे बोलणे हे अपमानास्पद असल्याची टीका राज्यातील समस्त महिला हक्काच्या चळवळीतील नेत्यांनी केलेली आहे. तसेच, राज्य महिला आयोगाच्या वतीने अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील तातडीने संभाजी भिडे यांना नोटीस पाठवलेली आहे.
प्रतिक्रिया देण्यास नकार दिला - महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(२) (क) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या आधारे संभाजी भिडे यांना ही नोटीस पाठवलेली आहे. यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले,"महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्री चा दर्जा विच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो, आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक वर्तनाला ठेच पोहचविणारे आहे."
मूलभूत अधिकाराचा संकोच - स्त्री हक्काच्या चळवळीतील कार्यकर्ता ज्योती साठे , वर्षा विद्या विलास कुंदा प्रमिला निळकंठ , ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश सावंत सिताराम शेलार अशा अनेक पुरुष महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचे हे वागणे स्त्री पुरुष समानतेला पायदळी तुडवण्यासारखे आहे .राज्यघटनेच्या समानता या मूल्यांचा हा अवमान आहे.
तसेच सार्वजनिक रित्या अशी कृती करणे ही कुठल्याही महिलेला अपमान स्पर्धच आहे प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे कोणत्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचा पेराव करावा काय पद्धतीने रहावे हे राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा संकोच करण्यासारखे आहे." असे त्यांनी म्हटलेले आहे.