मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होईल. या बैठकीत चक्रीवादळाचा आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत देण्यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे.
नुकसान भरपाईबाबत निर्णय होण्याची शक्यता
मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाण्याला तौक्तेचा तडाखा बसला आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये वादळाच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यादरम्यान शेतकरी तसेच मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. तर 12 जणांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार असून नुकसान भरपाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.