ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी इटालियन हिंदुत्व स्वीकारले आहे का? - आचार्य तुषार भोसले - विजय वडेट्टीवार साधुंबाबत आक्षेपार्ह उद्गार

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधुंबाबत आक्षेपार्ह उद्गार काढले. यामुळे हिंदू समाज महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहे. त्यामुळे भाजप अध्यात्मिक आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आचार्य तुषार भोसले आणि साधू संतांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

Acharya Tushar Bhosale on cm uddhav thackeray

author img

By

Published : Feb 25, 2021, 3:09 PM IST

मुंबई - पालघर जिल्ह्यात झालेल्या साधु हत्याप्रकरणाला दहा महिने उलटले व राज्यात हिंदू विरोधी होणाऱ्या घटना याप्रकरणी अद्यापही कोणतीच कठोर कारवाई नाही. त्यातच सहकारी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधुंबाबत आक्षेपार्ह उद्गार काढले. यामुळे हिंदू समाज महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहे. त्यामुळे भाजप अध्यात्मिक आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आचार्य तुषार भोसले आणि साधू संतांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

मुंबई

वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व साधु-समाज तीव्र निषेध करत आहेत. १५ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या रामकुंडावर साधु-महंतांनी शंखनाद आंदोलन करून आपल्या तीव्र भावना देखील व्यक्त केल्या आहेत. पण, यासंदर्भात महाविकास आघाडीकडून कोणतेही निर्णय किंवा स्पष्टीकरण नाही. १५ डिसेंबर २०२० रोजी विधानसभेत म्हणाला होतात, हा साधु-संतांचा महाराष्ट्र आहे, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. मग असे असताना आपला सहकारी मंत्री साधुंविषयी अपशब्द म्हणतो तर आपल्याला झोप कशी लागू शकते? असा सवाल तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना केला आणि मुख्यमंत्र्यांनी आपले हिंदुत्व सोडले आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला.

साधुंचा अवमान करणाऱ्या मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे अन्यथा आपल्या हिंदुत्वाच्या उपरण्याला इटलीचे काठ आहेत हे आपण मान्य करावे, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.