मुंबई - कोरोनाच्या बाबतीत राज्यातील आरोग्य खाते आणि अन्न खाते यांना सुचना दिल्या असून, मास्कचा काळा बाजार बनावट सॅनिटायझरच्या बाबतही पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. राज्यामध्ये कोरोनाचे पडसाद उमटत असताना समाज माध्यमावरून अफवा पसरवणाऱ्यांवर सक्त कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
व्हाॅटस्अॅप आणि तत्सम माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रमाण जास्त असून, कोरोनाची भीती दाखवली जात आहे. याचाच फायदा घेऊन बनावट मास्क आणि इतर मेडीकल साहित्याचे वाटप केले जात आहे. यावर राज्य सरकार कडक कारवाई करतच आहे. अशांवर आयटी ॲक्टच्या माध्यमातून अटक केली जाणार असल्याचे गृहराज्यमंत्री म्हणाले.
कारागृहातील कैद्यांची तपासणी करण्याचे आदेश -
राज्याच्या सर्व कारागृहामध्ये डॉक्टरांची टीम पाठवून कैद्यांची कोरोना चाचणा करण्याचे आदेश दिले आहेत.
महिला आत्याचाराच्या बाबतीत दिशा कायद्यासाठी दोन दिवसाचे अधिवेशन घ्यावे या बाबतीत मुख्यमंत्र्यांना विनंती केली असून, त्यांनी मान्यता दिली की दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून कायदा आणण्यात येईल. असेह पाटील यांनी सांगितले.