ETV Bharat / state

Mental patients : मानसिक रुग्ण आता रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये; राज्य सरकार उचलणार मानसिक रुग्णांचा भार

author img

By

Published : Jan 30, 2023, 8:15 PM IST

गेल्या काही वर्षात बदलत्या सवयी आणि जीवनमान यामुळे मानसिक आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यापैकी काही रुग्णांना मानसिक उपचार करणाऱ्या रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र रुग्णालयातून असे रुग्ण बरे झाले तरी त्यांचे नातेवाईक आणि समाज त्यांना स्वीकारत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना आता रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवले जाणार आहे. त्यासाठी लागणार खर्च राज्य सरकारकडून केला जाणार आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक स्वप्नील लाळे यांनी दिली.

Mental patients
रिहॅबिलिटेशन सेंटर

मुंबई : मानसिक आजारांमध्ये नैराश्य, स्क्रिझोफेनिया, एन्झायटी आदी प्रकारचे आजार होतात. ड्रग्स आणि अल्कोहोल यामुळेही मानसिक संतुलन बिघडते. जीवनात एखादा प्रसंग काहींच्या मानसिकतेवर परिणाम करतो. अशा परिस्थितीतील रुग्णांना घरी ठेवण्याचे धाडस कुटूंबीय करत नाहीत. बाजूचे लोक आपल्याला काय बोलतील या भीतीने नातेवाईक रुग्णांना थेट मानसिक उपचार करणाऱ्या रुग्णालयात दाखल करतात. या रुग्णांना नातेवाईक भेटायला सुद्धा येत नाहीत. त्यामुळे या रुग्णांची जबाबदारी रुग्णालयावर असते. नातेवाईकाना त्यांचा रुग्ण बरा झाला आहे. त्याला आता घरी औषधोपचार केल्यास तो सामान्य जीवन जगू शकतो असे सांगूनही नातेवाईक रुग्णांना घरी घेऊन जात नाहीत अशी माहिती लाळे यांनी दिली.

सरकार मनोरुग्णांच्या रिहॅबिलिटेशनचा खर्च करणार : मानसिक उपचार करणाऱ्या रुग्णांना नातेवाईक घरी घेऊन जाण्यास तयार नसल्याने आता त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ठाणे मानसिक उपचार रुग्णालयात २० ते ३० वर्षे असलेले २०० रुग्ण आहेत. त्यापैकी ४० रुग्णांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवले जाणार आहे. रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये एका रुग्णावर महिन्याला १३ हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च आता राज्य सरकारचा समाज कल्याण विभाग करणार आहे असे लाळे यांनी सांगितले.

काय आहेत नातेवाईकांच्या अडचणी : मानसिक रुग्ण ज्याच्या घरी असतो अशा कुटूंबातील ८० टक्के नातेवाईक त्याला घरी ठेवत नाहीत. काही असे रुग्ण असतात ज्यांना औषधे दिली तरी ते घरी राहू शकतात. मात्र मध्यमवर्गीय कुटूंबातील लोकांना रुग्णांच्या औषधांचा खर्च झेपत नाही. बाजूला राहणारे लोक मानसिक रुग्णाला घरी का ठेवले असे टोचून बोलत असतात. सर्वोच्च न्यायालय आणि मानवी हक्क आयोगाने मानसिक रुग्णांना घरी नातेवाईकांसोबत राहणे हा त्यांचा हक्क आहे असे म्हटले आहे. काही वेळा मानसिक रुग्ण नातेवाईक घरी घेऊन जात नसल्याने पोलिसांची मदत घेऊन त्या रुग्णांना घरी पाठवावे लागते असे लाळे यांनी संगितले.

औषधांपेक्षा हे उपाय करा : मानसिक रुग्णांना झोप लागत नाही, भविष्यात काय होईल याची भीती असते अशा रुग्णांना आम्ही औषधे घेऊन बरे करण्यापेक्षा त्यांनी आपल्या जीवनात आणि विचार करण्यात बदल करावा. भविष्याचा विचार करण्यापेक्षा आताचा क्षण जीवनात पुन्हा येणार नाही. वर्तमानात चाला, काल्पनिक भीती बाळगू नका. रोज मित्र परिवारासोबत गप्पा मारणे, बाहेर फिरणे, व्यायाम करणे, काम करणे, योग्य, व्यायाम, पोहणे, मैदानी खेळे या सारख्या उपाययोजना केल्यास औषधे न घेता यामधून बाहेर पडता येते. आमच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत औषधे दिली जातात अशी माहिती ठाणे मानसिक रुग्ण उपचार रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.

मुंबईत ३१ मनोविकराचे रुग्ण : महापालिकेच्या ४ प्रमुख रुग्णालयांमध्ये म्हणजेच केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांमध्ये ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षांच्या कालावधी दरम्यान येऊन गेलेल्या रुग्णांपैकी ५ लाख ५९ हजार ९५४ रुग्णांची माहिती अभ्यासण्यात आली. यापैकी १ लाख ७४ हजार ३७९ रुग्ण हे मनोविकारावरील उपचारांसाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये आल्याचे समोर आले होते.

हेही वाचा : Brain Fog Symptoms : ब्रेन फॉगच्या तीव्र लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.