ETV Bharat / state

Alerts On Increasing Corona : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या सतर्क राहण्याच्या सुचना

आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर (increasing number of corona patients) राज्य सरकारने सतर्कतेच्या सुचना (State government alerts) दिल्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्या (RTPCR tests) तसेच लसीकरणाचा वेग वाढवा, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Increasing Corona
कोरोनाच्या वाढतोय
author img

By

Published : Jun 4, 2022, 10:51 PM IST

मुंबई: राज्यात आज कोरोनाचे १३५७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. (increasing number of corona patients) पैकी ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसागणिक ही संख्या वाढते आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे तीनशे रुग्ण वाढले आहेत. रुग्ण वाढत असले तरी राज्यातील चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. १ जूनच्या माहितीनुसार राज्यातील २६ जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षाही कमी आहे. यात तत्काळ सुधारणा करणे आवश्यक आहे.

प्रति १० लाख लोकसंख्येमागे एका आठवड्यात किमान ९८० चाचण्या करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आदेश आहेत. एकूण चाचण्यांपैकी ६० टक्के चाचण्या आरटीपीसीआर असाव्यात, असे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. तसेच दर आठवड्याला सर्व लॅबोरेटरी चालकांची बैठक घ्यावी. कोविड १९ पोर्टलवर माहिती भरली जावी. रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जावी. ज्या लॅबोरेटरी मध्ये अतिशय कमी अथवा एकदम जास्त रुग्ण आढळतील, त्यावर देखरेख ठेवावी, असे आदेश डॉ. व्यास यांनी दिले (State government alerts) आहेत.

राज्याच्या काही भागात कोविड विषाणूचे विविध व्हेरियंट आढळले होते. या पार्श्वभूमीवर नवीन पॉझिटिव्ह केसेस बाबत दर आठवड्याला विश्लेषण केले जावे. या आधारे स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे शक्य होईल. नवीन रुग्ण आणि पुन्हा बाधित होणारे रुग्ण याबाबत विश्लेषण केले जावे, असे व्यास यांनी नमूद केले आहे. नजिकच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून रुग्णालयातील पायाभूत सुविधा, कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा व्यवस्थित आहेत का याची पाहणी करावी. मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, यंत्रसामग्री आदी सुस्थितीत आहेत याची खात्री करावी, असेही डॉ. व्यास यांनी पत्रात नमूद केले आहे.

ताप आणि साथीने आजारी असणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवावे. ताप अथवा घशात खवखव असणाऱ्या नागरिकांनी चाचणी करुन घ्यावी. सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सैनिटायझेशनचा वापर करावा. ट्रेन, बस, चित्रपटगृह, कार्यालय, महाविद्यालय, दवाखाना आणि शाळांत मास्क वापरण्यास बंधनकारक करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच बारा ते अठरा वयोगटातील लसीकरणाचा वेग आणखी वाढवा. लसीकरण आणि संरक्षक लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन डॉ. व्यास यांनी केले.

हेही वाचा : राज्यात मास्क सक्ती नाही; कोरोना वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आरोग्यमंत्र्याचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.