ETV Bharat / state

बनावट मद्य विक्री आणि मद्य प्राशन करणाऱ्या तळीरामांवर होणार कारवाई - राज्य उत्पादन शुल्क विभाग न्यूज

डिसेंबर महिन्याच्या अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला अवैध मद्य विक्रीचे प्रमाण जास्त असते. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक दक्षतेने काम करणार आहे. यासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.

तळीरामांवर होणार कारवाई
तळीरामांवर होणार कारवाई
author img

By

Published : Dec 22, 2019, 7:32 PM IST

मुंबई - डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना पार्ट्यांमध्ये दारूचा वापर केला जातो. याच काळात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा व्यवसाय होतो. याला आळा घालण्यासाठी पार्ट्यांमध्ये अवैध दारू सापडल्यास विक्रेते आणि ग्राहक या दोघांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. यासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.

डिसेंबर महिन्याच्या अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला अवैध मद्य विक्रीचे प्रमाण जास्त असते. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक दक्षतेने काम करणार आहे. विनापरवाना, भेसळयुक्त मद्याचा वापर सार्वजनिक समारंभांसाठी करू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.

हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : अध्यक्ष वरियंम सिंग यांच्या घराबाहेर आंदोलन

महाराष्ट्रात दारू महाग आहे. त्यामुळे सीमेलगत असलेल्या गोवा, दमण, दादरा, नगर हवेली, सिल्वासा या राज्यातून उत्पादन शुल्क न भरता बनावट दारू राज्यात येण्याची शंका राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 9 भरारी पथके तयार केली असून त्यांच्या माध्यमातून मुंबईबाहेरून येणाऱ्या गाड्यांची तपासणी मोहिम राबवण्यात येणार आहे.

Intro:मुंबई - डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नाव वर्ष स्वागत साजरे करताना पार्टीमध्ये आपण दारू पिता का. जर आपण दारू पीत असाल तर ती दारू अवैध असल्यास आपले नव वर्ष तुरुंगात जाऊ शकते. नाताळ आणि नव वर्षाच्या पार्टीमद्ये अवैध दारू सापडल्यास ती दारू विकणाऱ्या आणि पिणाऱ्या तळीरामांवर कारवाई करणार असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. मुंबईत येणारी ट्रॅव्हेल्स बसेस, रेल्वे यामध्ये तपासणी केली जाणार आहे. Body:नाताळ आणि नव वर्षाचे स्वागत करताना आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये दारूचा वापर मोठया प्रमाणात होतो. याच कालावधीत मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होते. त्यामुळे दारू पिणाऱ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. याची गंभीर दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली आहे. या काळात, अवैध मद्य विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक दक्षतेने काम करणार असून विनापरवाना वा भेसळयुक्त. ड्यूटी फ्री, डिफेन्स मद्याचा वापर सार्वजनिक वा समारंभाकरीता करण्यात येऊ नये. असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यात दारू महाग आहे. सीमेलगत असलेल्या गोवा, दमण, दादरा, नगर हवेली, सिल्वासा या राज्यातून उत्पादन शुल्क न भरता दारू, बनावट दारू, ड्युटी फ्री दारू, अवैध हातभट्टीची दारू राज्यात येणाची शंका राज्य उत्पादन विभागाला आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 9 भरारी पथके तयार केली असून त्यांच्या माध्यमातून मुंबईबाहेरून येणाऱ्या ट्रॅव्हेल्स बसेस, रेल्वेमध्ये तपासणी मोहिम राबवण्यात येणार आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन -
अवैध हातभट्टी मद्य, बनावट मद्य, डयूटी फ्री मद्य, डिफेन्स मद्य, तसेच, विनापरवाना मद्य पार्टीेबाबत काही माहित असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस विभागास तात्काळ कळवावे. उच्च प्रतीचे मद्य, स्कॉच, ड्यूटी फ्री अथवा बनावट भेसळ केलेल्या मद्याचा अवैधरित्या वापर, प्राशन करणे यामुळे कारवाईस सामोरे जावे लागेल, आपली आर्थिक फसवणूक व आरोग्याकरीता हे मद्य अपायकारक ठरू शकते. असेही आवाहन करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.