मुंबई - राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत स्व:त ट्विट करून माहिती दिली. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी ते दाखल झाले असल्याची माहिती आहे. नजीकच्या काळात आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन, असे ट्विट त्यांनी केले आहे.