ETV Bharat / state

नवीन महाविद्यालय सुरू करा मात्र रोजगारभिमुख अभ्यासक्रमांचा विचार करा - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ( Higher Education and Development Commission Meeting ) होते. विद्यार्थ्यांची क्षमता वाढीबरोबरच रोजगार निर्मिती आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे नवीन अभ्यासक्रम तयार करावेत असा निर्णय त्यात झाला.

Deputy Chief Minister
उपमुख्यमंत्री
author img

By

Published : Nov 12, 2022, 2:07 PM IST

मुंबई : नवीन महाविद्यालय सुरू करा मात्र रोजगारभिमूख अभ्यासक्रमांचा विचार करा असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ( Focus On Employment Generation ) आहे. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत ( Higher Education and Development Commission Meeting ) होते. त्यात निर्णय झाला.

रोजगार निर्मिती : नवीन महाविद्यालयांना मान्यता देताना विद्यार्थ्यांची क्षमता वाढीबरोबरच रोजगार निर्मिती आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे नवीन अभ्यासक्रम तयार करावेत त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यास मदत होईल. विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयाने प्रत्येकी पाच वर्षांसाठी एक सर्वसमावेशक सम्यक योजना तयार करून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी शैक्षणिक वर्षांच्या आधी प्रसारित करावी. ग्रामीण आदिवासी भागातील शैक्षणिक सुविधांचा आढावा ( Review Educational Facilities In Rural Tribal Area ) घेऊन त्या भागातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रमासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे.अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

उच्च शिक्षणासाठी महाविद्याल : तसेच उच्च शिक्षणासाठी महाविद्यालया बाबत डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या मार्गदर्शक सूचनांवर चर्चा करून निकषात बसणाऱ्या नवीन महाविद्यालयास मान्यता देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या मंत्रीगटासमोर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत सुद्धा सादरीकरण करण्यात आले. बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,इतर अधिकारी उपस्थित होते.ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.