मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिवहनमंत्री अनिल परब यांनी येत्या गुरुवारपर्यंत एका महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे. इतर थकीत पगाराबाबत लवकरच निर्णय घेऊ, असेही अनिल परब यांनी सांगितले. नुकतेच ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
-
एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री @AjitPawarSpeaks यांची भेट घेतली.या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले.कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. pic.twitter.com/KVI9RTj7Fm
— Anil Parab (@advanilparab) October 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री @AjitPawarSpeaks यांची भेट घेतली.या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले.कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. pic.twitter.com/KVI9RTj7Fm
— Anil Parab (@advanilparab) October 1, 2020एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री @AjitPawarSpeaks यांची भेट घेतली.या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले.कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. pic.twitter.com/KVI9RTj7Fm
— Anil Parab (@advanilparab) October 1, 2020
एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे टि्वट परब यांनी केले आहे.
एसटीतून फार कमी उत्पन्न मिळत आहे. पगार जवळपास 300 कोटी रुपयांचा आहे. म्हणून 2 महिन्यांपूर्वीच राज्य सरकारकडून 550 कोटी रुपये घेऊन पगार दिले होते. मी पुन्हा एकदा राज्य सरकारकडे पगारासाठी पैशांची मागणी केली आहे. बँकेतून कर्ज काढून पगार देता येईल का, याबाबत देखील प्रयत्न सुरू आहेत, असे अनिल परब यांनी यापूर्वी सांगितले होते.