ETV Bharat / state

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरीला दिवाळीत 'शंभर कोटीं'चा फटका..! - एसटी कर्मचाऱ्यांचे संप

मागील दोन आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सुमारे शंभर कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाला संपामुळे आज सुमारे 15 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. संपावर लवकर तोडगा निघाला नाही तर हा तोटा वाढण्याची भीती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Nov 8, 2021, 8:30 PM IST

मुंबई - मागील दोन आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सुमारे शंभर कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाला संपामुळे आज सुमारे 15 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. संपावर लवकर तोडगा निघाला नाही तर हा तोटा वाढण्याची भीती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दररोज 15 कोटी रुपयांचा महसुलावर पाणी

महाराष्ट्रात सार्वजनीक वाहतूकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, असेही एसटीला संबोधले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एसटीमध्ये उत्पन्नपेक्षा सेवेसाठी खर्च जास्त होत आहे. तसेच दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या तोटा वाढत जात असल्यामुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. त्यातच आता आपल्या विविध मागण्या घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा संप आता चांगलाच चिघळला असून यामुळे प्रवाशांबरोबर एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी 100 कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला. एसटी महामंडळाला संपामुळे आज सरासरी 15 कोटी रुपयांचा महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

राज्यातील 240 आगार बंद

एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप चिघळला असून राज्यात काम बंद हाेत असलेल्या डेपाेंच्या संख्येत दिवसाला वाढ हाेत आहे. शनिवारी एसटीचे तब्बल 65 डेपाे आणि रविवारी 127 आगार बंद राहिले आहे. तर आज राज्यातील 250 एसटी आगारांपैकी 240 आगार बंद होते. याशिवाय कुर्ला-नेहरूनगर, उरण, परेल, लांजा, देवरुख, खेड, गारगोटी, कागल, गडहिंग्लज आणि इगतपुरी हेच दहा आगार सुरू होते. दिवाळी सण साजरा करून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची या संपामुळे प्रचंड हाल झाले आहे.

दिवाळीचा हंगामातील महसुलावर पाणी

कोरोनामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटी महामंडळाला दिवाळी सणातमोठी अपेक्षा होती. त्यानुसार, एसटी महामंडळाने दिवाळीत अतिरिक्त बस गाड्याही चालविण्यांचे नियोजन केले होते. मात्र, आपल्या विविध मागण्यासाठी एसटी कामगार कृती समितीने 27 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण पुकारले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत यशस्वी चर्चेअंती आपले आंदोलन 28 आक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेतले होते. मात्र, एसटी महामंडळ शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारला आहे. आज या संपला 12 दिवसांत पूर्ण होत आहे. यामुळे दिवाळीचा हंगामातील महसुलावर एसटी महामंडळाला पाणी सोडावे लागले आहे.

हे ही वाचा - ST Workers Strike : लालपरीच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार; राज्यातील २४० एसटी आगार बंद!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.