ETV Bharat / state

Ram Navami Celebrations : ठाकूरद्वार येथे आहे प्रसिद्ध प्राचीन काळाराम मंदिर, 'या' मंदिराच्या घुमटात लपलंय काय हे पहा!

गिरगावला लागूनच असलेल्या ठाकूरद्वार परिसरात काळाराम मंदिर आणि झावबा मंदिर अशी रामाची दोन मंदिरं आहे. या दोन्ही मंदिरात चार्तुमासात कीर्तनं होतात. प्राचीन असे आत्मारामबुवांचे मंदिर हे काळाराम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. 1828 मध्ये स्थापन झालेल्या या काळाराम मंदिराच्या घुमटात काय आहे आणि या मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व काय हे आपण जाणून घेणार आहोत.

Ram Navami Celebrations
Ram Navami Celebrations
author img

By

Published : Mar 29, 2023, 10:03 PM IST

Updated : Mar 30, 2023, 9:43 AM IST

ठाकूरद्वार येथील प्राचीन काळाराम मंदिर

मुंबई : श्रीराम नवमीच्या उत्सवानिमित्त ठाकूरद्वार येथील या काळाराम मंदिरात भाविकांची लागते. या मंदिराचे खास आकर्षण म्हणजे येथे असलेल्या काळ्या पाषाणाच्या पुरातन मूर्ती. प्रभू श्रीराम यांच्या मांडीवर विराजमान झालेली सीतामाता असून बाजूला लक्ष्मण, शत्रुघ्न आणि परमभक्त हनुमान हे देखील आहेत. या मंदिरात गेली 51 वर्ष कामाची सेवा करणारे गुरुजी गोविंदराव मनेरीकर हे आहेत. त्या मंदिराच्या शेजारीच श्री वेंकटेश मंदिर देखील अतिशय सुंदर आहे. राम मंदिराच्या बाजूलाच लागून श्री स्वामी समर्थांचे छोटे मंदिर देखील आहे. या मंदिराची उभारणी प्राचीन आणि सागवान लाकडाची असून जुन्या पद्धतीची प्रकाशयोजना करण्यात आलेली आहे. श्री रामाच्या गाभार्‍यासमोरच या मंदिराची स्थापना करणारे आत्माराम बुवा यांची समाधी आहे.

कोण आहेत आत्माराम बुवा? : कोकणातल्या एका गावात गरीब कुटुंबात एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव आत्माराम. त्यांनी संपूर्ण देशाचे पर्यटन केलं. शेवटी ते मुंबई झाले. मुंबईत आल्यानंतर आत्माराम यांची पाठारे प्रभू यांच्याशी ओळख झाली. दरम्यान भाऊचा धक्का जाने बांधला ते भाऊ रसूल देखील आत्माराम बुवांचे भक्त बनले. मुंबईतील सध्या असलेल्या काळाराम मंदिराची जागा आत्माराम बुवांच्या पसंतीस पडली. त्या ठिकाणी भाऊ रसूल यांच्या मदतीने राम मंदिर बांधले. त्या मंदिरातील ग्रामपंचायतनच्या मूर्ती आहेत. त्या काळ्या पाषाणाच्या असल्याने या मंदिराला काळाराम मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 1828 मध्ये आत्माराम बुवांनी या राम मंदिराची स्थापना केली. ठाकूरद्वार येथील काळाराम मंदिराचे विश्वस्त समीर रणजीत त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली.

काळाराम मंदिराच्या घुमटात लपलंय काय? : मंदिराचे विश्वस्त प्रदीप राणे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिराच्या घुमटात शंकराची पिंडी आहे. याच घुमटात 1800 मध्ये आत्माराम बुवा शिडीच्या सहाय्याने वरती जाऊन दिवस-रात्र तासंतास ध्यानधारणा तपश्चर्या करत. या शंकराच्या पिंडीचे दर्शन हे श्रावणातील चार सोमवार, महाशिवरात्री आणि वैकुंठ चतुर्दशीला भाविकांना दिले जाते. त्या दिवशी उत्सव असतो. मुंबईत अशी मंदिर फार दुर्मिळच आहेत. प्राचीन आणि जुन्या पद्धतीची असून त्या मंदिराची देखभाल गेली सतरा वर्ष रवींद्र नाईक हे करतात. त्यापूर्वी मंदिराची देखभाल मी रवींद्र नाईक यांचे सासरे करत.

मंदिरात दर्शनासाठी रीघ : श्रीराम नवमी दिवशी सकाळी सात वाजल्यापासून भाविकांची या मंदिरात दर्शनासाठी रीघ लागते. या मंदिराला सप्टेंबरमध्ये 195 वर्ष पूर्ण होणार असून पाच वर्षांनी 200 वर्ष पूर्ण होणार आहेत. दोनशे वर्षांपूर्तीनिमित्त मंदिराचा जिर्णोद्धार करणार असल्याचा मानस मंदिराचे विश्वस्त ललित कोठारे यांनी ईटीव्ही भारतकडे व्यक्त केला आहे. रामनवमी दिवशी या मंदिरात साजरा होणारा रामाचा जन्मोत्सव पाहण्यासारखा असतो. पालखी निघते, भजनं कीर्तनं होतात. दुपारी 12. 39 ला प्रभू श्रीरामांच्या चांदीच्या बाल रूपात असलेल्या मूर्तीला पाळण्यात घालून राम जन्मोत्सव मोठा थाटामाटात साजरा केला जातो.

हेही वाचा - Bharat Gogawle On Sanjay Raut : डॉक्टर साहेब संजय राउतांच्या तोंडाचे ऑपरेशन करा

Last Updated : Mar 30, 2023, 9:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.