मुंबई - कोरोनानंतर आता सर्वच सण नागरिक पुन्हा साजरे करत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. नाताळच्या सुट्टीमुळे देखील प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. सण साजरा करण्यासाठी प्रवाशांना रेल्वेने गावी जाणे शक्य व्हावे, यासाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतलेला आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई सेंट्रलपर्यंत सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवणार आहे. यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे.
अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्र. ०९१४१ वांद्रे टर्मिनस - अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल शनिवार, १४ जानेवारी २०२३ रोजी वांद्रे टर्मिनस येथून ०५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.१० वाजता अहमदाबादला पोहोचेल. ही गाडी बोरिवली, सुरत आणि वडोदरा स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर आणि द्वितीय श्रेणीचे सामान्य डबे असतील.
मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक ०९४१४ अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल रविवार, १५ जानेवारी २०२३ रोजी अहमदाबादहून ६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.५५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर आणि द्वितीय श्रेणीचे सामान्य डबे असतील.
पश्चिम रेल्वेकडून या विशेष ट्रेन गुजरात आणि महाराष्ट्र या ठिकाणी उद्योग धंदा करणारे अनेक नागरिक दर दिवसात ये जा करतात. सण असल्यामुळे नातेवाईकांसह मुंबईला येणारे आणि मुंबईहून परत आपल्या गावी सुरत, वापी, अहमदाबाद अशा विविध शहरात जाणारे नागरिक आहेत. त्यामुळेच या सर्वांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेकडून या विशेष ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहेत.
वांद्रेकडून मध्य रेल्वेला येणे होणार सोयीचे पश्चिम रेल्वेवर विशेष ट्रेन चालवल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर जायचे आहे, त्यांना मुंबई सेंट्रलवरून भायखळाला सहज जाता येऊ शकते. वांद्रेकडून मध्य रेल्वेला येणे हे सहसा अवघड असते. त्यामुळे मुंबई सेंट्रल होऊन अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल हा प्रवास मुंबईमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीचा होणार आहे. या विशेष ट्रेनसाठी पश्चिम रेल्वेच्या तसेच आयआरसीटीसी या संकेतस्थळावर नागरिकांना बुकिंग करता येईल. त्यामुळे नागरिकांनी यासाठी ऑनलाईन बुकिंगसाठी करावी असे आवाहनही पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे. त्याबाबत नागरिकांनी गाड्यांचे वेळापत्रक देखील पहण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केले आहे.