मुंबई - लाखो शिवसैनिकांचे दैवत असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फुटी पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा असणार आहे. 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीदिनी फोर्ट येथील रिगल सिनेमासमोरील चौकात तो उभारला जाणार आहे.
आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री येथे बाळासाहेबांच्या या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी केली. यावेळी पुतळा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर काही तांत्रिक गोष्टीच्या सूचना केल्या.
हेही वाचा - भारतीय तटरक्षक दलाने 264 मच्छिमारांना वाचवले
कलानगर येथील सुप्रसिद्ध वास्तूशिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारताना समोर नेमकी काय आव्हाने होती, याबाबत 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी जयाज्योती पेडणेकर यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभेला आल्यावर जनसमुदायला संबोधतानाचे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणणे हे सर्वांत कठीण काम होते. बाळासाहेब हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तीमत्व आहेत, त्यामुळे त्यांची हुबेहूब मूर्ती करणे हे एक आव्हान होते. एकप्रकारे शिवधनुष्यच पेलण्यासारखे होते, अशी प्रतिक्रिया वास्तू शिल्पकार शशिकांत वडके यांनी दिली.
हेही वाचा - नीरव मोदीच्या नाड्या आवळल्या; फरार आर्थिक गुन्हेगार घोषित