ETV Bharat / state

कोरोना विशेष: भारत तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर.. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती - corona special report

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कोरोना आजाराबाबत, खबरदारीच्या उपाययोजनांसाठी घ्यावयाची काळजीबाबत जाहीर आवाहन केले आहे. पाटील यांनी सरकारने आणि जनतेने काही महत्त्वाच्या बाबी करावयास सांगितल्या आहेत. तसेच कोरोनाबाधीत चार देश चीन, द. कोरिया, तैवान, सिंगापूर यांनी कोरोनावर आळा घालण्याचा कसा प्रयत्न केला याबाबत सांगितले आहे.

avinash patil corona special report
अविनाश पाटील
author img

By

Published : Mar 21, 2020, 4:45 AM IST

मुंबई - सध्या जगभर ‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराने जनजीवन प्रभावित झाले आहे. भारतातही आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात याचा शिरकाव झालेला आहे. देशामध्ये हा आजार तिसऱ्या टप्प्यात पोहचला तर काय होईल? यांचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कोरोना आजाराबाबत पत्रक काढले आहे. खबरदारीच्या उपाययोजनांसाठी घ्यावयाची काळजीबाबत जाहीर आवाहन त्यात त्यांनी केले आहे. पाटील यांनी सरकारने आणि जनतेने काही महत्त्वाच्या बाबी करावयास सांगितल्या आहेत. तसेच कोरोनाबाधीत चार देश चीन, द. कोरिया, तैवान, सिंगापूर यांनी कोरोनावर आळा घालण्याचा कसा प्रयत्न केला याबाबत सांगितले आहे.

कोरोना साथीला तोंड देण्यासाठी जन आरोग्य अभियानचे आवाहन !

चीनमध्ये डिसेंबरमध्ये सुरू झालेली कोरोना ताप, खोकला, न्युमोनियाची साथ फारच वेगाने जगभर पसरली आहे. तीन महिन्यात दीडशेहून अधिक देशांमध्ये दोन लाखाहून जास्त लोक या साथीने आजारी पडून सहा हजारपेक्षा जास्त दगावले आहेत. सर्व देशांचा अनुभव सांगतो की ही अतिशयच वेगाने पसरणारी, असाधारण साथ आहे व त्यामुळे असाधारण, खास पाउले उचलायला हवीत.

चीन या देशातून कोरोनाच उगम आणि तेथील काही निरीक्षणे -

चीनचा अनुभव सांगतो की कोरडा खोकला, जोरदार ताप व कधी कधी श्वास लागणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराचे ‘कोव्हिड-१९’ (COVID 19) हे विषाणू मारणारे औषध अजून सापडलेले नाही. नवीन औषध सापडून ते बाजारात यायला अनेक महिने लागतील. मात्र आपले शरीरच या विषाणूंवर विजय मिळवते. कोरोनाबाधितांपैकी ८० % रुग्णांना सौम्य आजार होतो व तापाची साधी परासिटमॉल गोळी, कोरड्या खोकल्या वर साधे औषध, विश्रांती याने तो ७ ते १४ दिवसांमध्ये बरा होतो. १५% रुग्ण गंभीर होतात; त्यांना करोना, न्युमोनिया होतो. त्याना इस्पितळात आणि त्यातील काही जणांना आय. सी. यू मध्ये उपचार करावे लागतात. एकूण रुग्णांपैकी सुमारे १ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. ६० वर्षाच्या वरील रुग्ण, तसेच ज्यांना दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजार असतील त्यांना तीव्र आजार होणे, दगावणे याचा धोका असतो. चीनमध्ये ९ वर्षाखालील कोणीही दगावले नाही आणि तरुण, निरोगी व्यक्तींमध्ये दगावण्याचे प्रमाण फारच कमी आहे. एकंदरीत स्वाईन फ्लू सारखा हा आजार आहे, मात्र त्याची संसर्गशीलता खूपच जास्त आहे.

कोरोनाबाधील इतर देशातील तिन्ही टप्पे आणि आकडेवारीचे गणित -

निरनिराळ्या देशांचा अनुभव सांगतो की परदेशातून आयात झालेली लागण (आयात-जन्य लागण ) हा या साथीचा पहिला टप्पा आहे. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना झालेली लागण हा या साथीचा दुसरा टप्पा. तो ओलांडून इथल्याच समाजात, आपापसातील संपर्कातून पसरलेली लागण (समाज-जन्य लागण ) या तिस-या टप्प्यात या साथीने प्रवेश केला की अतिशय वेगाने ही साथ पसरते. नोंदलेल्या रुग्णांची संख्या पहिल्या दोन-तीन आठवड्यांनंतर ५०-१०० च्या पुढे गेली की नंतरच्या आठवड्यामध्ये ती फारच वेगाने वाढू शकते. उदा. अमेरिकेत ३ मार्च ते १४ मार्च या ११ दिवसात रुग्णांची ६४ वरून २८ पट म्हणजे १६७८ झाली ! इटलीत २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या ११ दिवसात ती ७६ वरून ४० पट म्हणजे ३०४८ झाली ! तर १५ मार्च ती २५ हजार झाली ! चीन, इटली इराण इ. काही देशात हे फारच वेगाने झाले. पण इतरही अनेक देशांमध्येही साथीने तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे.

इटलीत आपल्यापेक्षा हॉस्पिटल्सची क्षमता (दर लाख लोकांमागे) कित्येक पट आहे. पण तिथे आजच हॉस्पिटल, आय. सी. यु. मधील खाटा अपु-या पडत आहेत. त्यामुळे भारतात इटली प्रमाणे या साथीचा समाज-जन्य प्रसार वेगाने झाला तर फारच अवघड होईल. भारतात ३० जानेवारीला पहिल्या केसची नोंद झाली आणि १५ मार्च पर्यंत १०७ जण आजारी व ३ मृत्यू अशी नोंद झाली आहे.

आपण तिस-या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत !

भारतात ही साथ तिसऱ्या टप्प्यात शिरून एकदम वेगाने लाखो लोकांपर्यंत पसरली तर त्यापैकी सुमारे १०% गंभीर रुग्णांना दाखल करण्या इतकी इस्पितळे, त्यात पुरेशा आय. सी. यू. खाटा हे सर्व आपल्याकडे नाहीय. एका जिल्ह्यात २० लाख लोकसंख्या असते. त्यातील ३० वर्षावरील लोकसंख्या १० लाख असते. त्यातील एक चतुर्थांश म्हणजे २.५ लाख लोकाना कोरोना आजार झाला तर त्यातील १०% म्हणजे २५ हजार लोकांना इस्पितळात ठेवावे लागेल. याच्या १०% सुद्धा खाटा सरकारी रुग्णालयांमध्ये आज नाहीयेत ! दुसरे म्हणजे बहुतांश जनतेला हॉस्पिटलमधील उपचार मोफत मिळाले तरच ते हे उपचार घेऊ शकतील. पण गेल्या ४० वर्षातील खासगीकरणाच्या धोरणामुळे आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची पडझड झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे काय होणार हा मोठा यक्ष प्रश्न आहे.

अर्थात या साथीचा घाबरून जाऊन धसका न घेता ही साथ जास्त पसरणार नाही यासाठी आटोकाट प्रयत्न करायची गरज आहे. हे लक्षात घेता नागरिकांनी, आरोग्य व्यवस्थेने आणि सरकारने कोणती पाउले उचलायला हवी हे आपण पाहू या. पैकी नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर घ्यायच्या काळजी बाबत शेवटी दिलेली चौकट पाहावी.

सरकारचे धोरण -

या साथीला तोंड देण्यासाठी सरकारने लगेच जी पाउले उचलली त्यांचे आम्ही स्वागत करत असल्याचे अंनिसचे अविनाश पाटील यांनी म्हटले आहे.

कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच छाननी लगेच सुरु करणे; त्यांनी १४ दिवस घरीच थांबावे आणि इतर सर्वांपासून अलग राहावे असा सल्ला त्यांना देणे; त्याचा पाठपुरावा करून त्यांच्या पैकी ज्यांना नंतर ताप, खोकला आला त्यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करणे; ज्यांच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला त्यांना इतरांपासून अलग ठेवण्यासाठी त्यांना खास कक्षामध्ये दाखल करून सरकारी खर्चाने गरजेप्रमाणे उपचार करणे; त्यांच्या संपर्कात आलेल्यांना भेटून त्यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करणे इ. सर्व गोष्टी सरकारी आरोग्य व्यवस्थेने नेटाने केल्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून ही साथ पसरण्याला चांगला आळा बसला आहे हे स्वागतार्ह आहे. शाळा, महाविद्यालये पासून अधिकाधिक प्रमाणात सार्वजनिक संस्था/ आस्थापने ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा आदेश देणे हेही स्वागतार्ह आहे. पुण्यासारख्या ठिकाणी दुकानदार, हॉटेल मालक यांनी आपणहून तीन दिवस व्यवसाय बंद करायचे ठरवले तेही स्वागतार्ह आहे.

पण हे पुरेसे नाही. जगात फक्त चारच देशांमध्ये या साथीला रोखण्यात सध्या यश आले आहे. चीन, द. कोरिया, तैवान, सिंगापूर. त्यांनी हे यश कसे मिळवले हे समजावून घेऊन ताबडतोबीने आपण आणखी काही सुयोग्य पाउले टाकायला हवी. या चार देशांमध्ये खालील दोन मुख्य पाउले पूर्ण ताकदीने उचलली आहेत की जी इतर देशांमध्येही काही प्रमाणात उचलली गेली आहेत.

मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घशातील स्त्रावाची तपासणी -

एक तर चीन, द. कोरिया, तैवान, सिंगापूर या देशांमध्ये कोरोनाची लागण कोणाला झाली आहे का ते शोधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घशातील स्त्रावाची तपासणी केली जाते. ज्यांची तपासणी केली जाते असा एक गट म्हणजे कोरोनाबाधित देशांमधून, कोरोनाबाधित प्रदेशातून आलेल्या व्यक्ती. कोरोनाग्रस्त देशातून या देशांमध्ये आलेल्या अशा लोकांना ताप आहे का ते विमानतळावर बघितले जाते. ताप, खोकला असेल तर त्यांना वेगळे काढून त्यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करून त्याचा रिपोर्ट नेगेटीव्ह आला तरच त्यांना घरी जाऊ दिले जाते. बाकीच्या अशा बाधित देशातील सर्व प्रवाशांचा १४ दिवस पाठपुरावा केला जातो. त्यापैकी कोणाला नंतर खोकला-ताप आला तर त्यांचीही तपासणी केली जाते. ती पॉझिटीव्ह आली तर त्यांना इतरांपासून वेगळे करून १४ दिवसात विलगीकरण कक्षात ठेवले जाते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाते व ज्यांचा रिपोर्ट पोझिटीव्ह येईल त्यांनाही १४ दिवस विलगीकरण (Isolation) कक्षात ठेवले जाते. असे केल्यामुळे सर्व आयात-जन्य केसेस हुडकल्या जातात. भारतातही थोड्या फरकाने अशाच प्रकारे आयात-जन्य केसेस हुडकल्या जाऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांच्यापासून होणारा प्रसार रोखला जातो आहे.

याशिवाय या चार देशांमध्ये आणखी एक गोष्ट केली जाते. खोकला-ताप असलेल्या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाची घरोघर जाऊन तपासणी केली जाते. ती पोझिटीव्ह आली तर त्यांच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली जाते. तसेच इतर निकष वापरून इतर अनेक नागरिकांची तपासणी केली जाते. त्यामुळे फक्त आयात-जन्य करोना-रुग्णच नव्हे तर स्थानिक, समाज-जन्य रुग्णही हुडकले जातात. त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्याना १४ दिवसात विलगीकरण कक्षात ठेवले जाते.

भारतात मात्र आतापर्यंत फक्त आयात-जन्य रुग्ण हुडकून त्यांच्यावर उपचार व त्यांचे विलगीकरणा एवढेच केले जाते. या धोरणात दोन तृटी आहेत.

भारताच्या धोरणातील त्रूटी -

एक तर परदेशातून येणारे काही रुग्ण असे असतात की ज्यांना विमानातून उतरताना अजून ताप, खोकला सुरु झालेला नसतो. नंतर दोन, चार दिवसात येऊ लागतो. तो पर्यंत आपल्याला करोनाची लागण झाली आहे हे त्या रुग्णालाही माहीत नसते. खोकला, ताप सुरु झाल्याची माहिती त्यातील बहुसंख्य रुग्ण आपणहून आरोग्य अधिका-याना देत नाहीत; त्यातील अनेकांच्या लक्षातही येत नाही की आपल्याला करोना आजार झाला आहे. त्यातील बहुसंख्य जणांना सौम्य आजार असल्याने ते नेहेमीसारखे समाजात वावरतात आणि ते बरे होईपर्यंत त्यांच्या नकळत हे विषाणू दोन आठवडे पसरत राहतात. या आयात रुग्णांपासून ज्यांना सौम्य करोना अाजार होतो त्यानाही माहीत नसते की आपल्याला करोना-आजार झाला आहे. त्यामुळे तेही न कळत करोना विषाणू पसरवत राहतात. करोना विषाणूचा प्रसार होण्याची अशी साखळी चालू राहते. या प्रक्रियेला करोनाचा ‘कम्युनिटी स्प्रेड’ म्हणतात. सर्वच देशात ‘कम्युनिटी स्प्रेड’ होतो.

दुसरी त्रुटी म्हणजे खोकला ताप सुरु होण्या आधीही काही जणांच्या श्वासातून थोडे विषाणू बाहेर पडतात. त्यांचा सगळ्यांच्या नकळत ‘गुप्त’पणे प्रसार होतो. करोनाचा बहुतांश प्रसार रुग्णाच्या खोकण्यातून जे तुषार (droplets) बाहेर पडतात त्यातील विषाणू इतरांच्या श्वास-मार्गात गेल्याने होतो हे खरे असले तरी हा ‘गुप्त’ प्रसारही काही प्रमाणात होताच असतो ! हे सर्वच देशांमध्ये होते !

सामाजिक अलगिकरण -

वरील दोन प्रकारे होणारा करोनाचा ‘कम्युनिटी स्प्रेड’ (समाजजन्य प्रसार) रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपण सर्वानी आपापल्या घरात रहायचे, समाजातील इतर सर्वांपासून काही आठवडे दूर रहायचे !

वरील चार देशात हा सामाजिक अलगिकरणाचा मार्गपूर्ण ताकदीने अवलंबिण्यात आल्यामुळे तिथे ही साथ सध्या रोखली जाण्यात फार मोठी मदत झाली आहे. चीनमध्ये वूहान आणि इतर काही शहरांमध्ये सर्व लोकांना दोन आठवडे अजिबात घराबाहेर पडायचे नाही असा आदेश सरकारने काढला व जबरदस्तीने राबवला. मात्र घरोघर किराणा माल, दूध आदी पोचवले. तैवान, सिंगापूर, दक्षिण कोरिआ या देशांमध्ये जबरदस्ती न करता स्थूलमानाने लोकशाही मार्गाने, लोकांना समजावून सांगून, त्यांचे सक्रीय सहकार्य घेऊन हा मार्ग राबवण्यात आला.

भारतात लोकशाही चौकटीत राहून ज्या प्रमाणात हा सामाजिक अलगिकरणाचा मार्ग वापरला जाईल तितकी ही साथ आटोक्यात यायला सर्वात मोठी मदत होईल. मात्र भारतातील ९०% जनता असंघटित क्षेत्रात काम करते. सुट्टी घेऊन घरी बसायचे म्हणजे त्यातील बहुसंख्य लोकांना उपासमारीला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे हा मार्ग काही प्रमाणातच वापरता येईल. तसेच तसे करताना कष्टकरी गरीब जनतेची उपासमार होणार नाही हेही कटाक्षाने पहावे लागेल.

सरकारला अंनिसने केलेले आवाहन -

  • करोना आजाराची लक्षणे व इतर निकष वापरून ज्या रुग्णांच्या घशातील द्रावाची तपासणी करावीशी डॉक्टर्सना वाटेल, त्यांची तपासणी सरकारी केंद्रांमध्ये करण्याची व्यवस्था करा. सर्व डॉक्टर्सना याबाबत शास्त्रीय मार्गदर्शक सूचना पाळणे बंधनकारक करा.
  • खोकला, तापाच्या रुग्णांना प्राथमिक छाननीसाठी प्रवृत्त करणे, करोना रुग्णांच्या कुटुंबातील व इतर संपर्कातील व्यक्तींनी सरकारी आरोग्य सेवेला सहकार्य करणे, यासाठी त्यांचा पाठपुरावा करणे या व अशा कामासाठी पुरेशा प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्यांची नेमणूक करा.
  • प्रत्येक जिल्हयामध्ये निरनिराळी सरकारी रुग्णालये अशी सक्षम करा की ज्यात पुरेशा खाटा, डॉक्टर्स आदी कर्मचारी, आय. सी. यु खाटा व तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध असेल व गंभीर करोना रुग्णांवर नीट उपचार करता येईल. त्यासाठी येत्या काही महिन्यांमध्येच वेगवेगळ्या माध्यमातून अद्ययावत अधिकृत माहिती सरकारी रुग्णालये सक्षम करणे व काही नवीन बांधणे अशी पाउले उचला.
  • सरकारी दवाखाने, इस्पितळे इथे आणि वस्तीत काम करणा-या आरोग्यकर्मचार्यांना पुरेसे वैद्यकीय मास्क व इतर खास वेश, निर्जंतुकीकरण करण्यासाठी रसायने इ. पुरेशा प्रमाणात पुरवा.
  • जनतेला योग्य नेमकी माहिती पुरवणारी, त्यांच्या शंकाना उत्तर देणारी पुरेशी माहिती यंत्रणा उभारा. वेगवेगळ्या माध्यमातून अद्ययावत अधिकृत माहिती सोप्या भाषेत लोकांपर्यंत माहिती पोचावा. रोज आरोग्य बुलेटीन प्रसूत करा. बिनसरकारी सूत्रांनी माहिती पसरवण्यावर बंदी घालू नका. बिनसरकारी सूत्रांनी माहिती प्रसूत करताना त्याचा स्त्रोत हा सरकारी संस्था किंवा अधिकृत संस्था असाच असावा, ही अट ठेवून शास्त्रीय माहिती प्रसार करण्याच्या कामामध्ये संस्था, संघटनांना सामील करा. पारदर्शकता व सुयोग्य माहितीची सहज उपलब्धता हाच अफवांवरील उपाय आहे.
  • गरज पडली तर COVID-१९ बाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी, खाजगी इस्पितळातील काही खाटा व डॉक्टर्स, कर्मचारी सरकारी नियंत्रणाखाली आणण्याची तयारी करा.
  • ही व अशी पाउले उचलण्यासाठी आरोग्यावरील सरकारी खर्च मोठ्या प्रमाणावर ताबडतोब वाढवा. तो राज्याच्या एकूण बजेटच्या ८% करा अशी तज्ञांची शिफारस आहे. त्याची महाराष्ट्रात ताबडतोब अंमलबजावणी करा.
  • सरकारी रुग्णालये व आरोग्य केंद्रांचे होऊ घातलेले खाजगीकरणाचे सर्व प्रस्तावपूर्णपणे मागे घ्या आणि त्याऐवजी सरकारी हॉस्पिटल्स, आरोग्य सेवा बळकट करा.
  • अंगणवाडी, मध्यान्ह भोजन योजना इ. मार्फत मिळणारा पूरक आहार बंद होणार नाही अशी व्यवस्था करा.
  • या साथीला रोखण्यासाठी सरकारी व खाजगी आस्थापने बंद केली तर ही पगारी सुट्टी असेल असे जाहीर करा. काम बंद झालेले रोजंदारीवरील मजूर, मनरेगा मधील मजूर यांच्यासाठी बेकार भत्ता लागू करा. जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा रास्त भावात होईल यासाठी व्यवस्था करा.
  • ज्या भागात पूर्ण शट डाऊन करावे लागेल अशा भागात पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन द्या.

कोरोना साथीमध्ये नागरिकांनी घ्यायची काळजी -

विषाणूंच्या प्रसाराला आळा

रुग्णाच्या खोकल्या मार्गे बाहेर पडणा-या तुषारांमध्ये (droplet) हे विषाणू असतात. मुख्यत: यातुषारामार्फतयाविषाणूंचाइतरांनासंसर्गहोतो. खोकताना रुग्णाच्या तोंडासमोर रुमाल, मास्क नसेल तर खोकल्याचे तुषार समोरच्या व्यक्तीच्या नाकात जाऊन त्यामार्फत विषाणू थेट श्वासमार्गात शिरतात. तसेच हे खोकल्याचे तुषार, त्यातील विषाणू जवळपासच्या वस्तूंवर पडतात. तिथून ते इतरांच्या हाताला लागतात. तो हात नाकाला, चेह-याला लागला तर त्यातून ते श्वासमार्गात शिरतात. हे लक्षात घेता

खालील काळजी घ्यावी–

१) खोकला कशामुळेही असो खोकताना पटकन आपल्या आपल्या हाताचा कोपरा नाकाजवळ आणून दंडावरील बाही तोंडासमोर धरावी किंवा रुमाल नाकातोंडा समोर धरावा. रुमाल रोज धुवावा.

२) वारंवार, विशेषत: बाहेरून घरी आल्यावर हात साबणाने निदान वीस सेकंद धुवायचे, चेहरा धुवायचा अशी सवय लावून घ्यावी. ऑफिसेस, दुकाने इ. ठिकाणचे पृष्ठभाग रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ जंतुनाशक डेटोल सारख्या औषधी पाण्याने पुसून घ्यावे. ३) हात चेह-याला लागणार नाही याची काळजी घ्यायची सवय जाणीवपूर्वक आजपासूनच लावून घ्यावी.

४) हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करावा.

५) घशात शिरलेले विषाणू धुवून टाकण्यासाठी गरम पाण्याचे घोट घ्यावे, गुळण्या कराव्या.

मास्क वापरावा का?

कोणत्याही मास्कने करोना व्हायरस गाळले जात नाहीत. पण त्याला काही प्रमाणात अटकाव होतो. कारण करोना-व्हायरसचा प्रसार खोकल्यातून बाहेर पडणा-या तुषारांमार्फत होत होतो आणि या तुषारांना मास्कमुळे अटकाव होतो. N-95 नावाच्या महागड्या मास्कनेही करोना व्हायरस गाळला जात नाही पण तुषारांना जास्त प्रमाणात अटकाव होतो. डॉक्टरादी लोकांसाठी हे मास्क राखीव ठेवावे. ‘करोना’च्या संशयित तसेच खात्री झालेल्या रुग्णांनी साधा मास्क लावला पाहिजे म्हणजे त्यांच्या खोकल्यातून बाहेर पडणारे तुषार जास्त पसरणार नाहीत. इतरांनी कोणताही मास्क लावायची सध्या गरज नाहीय. साथ सुरु झाली तर साध्या मास्कचा उपयोग एव्हढाच आहे की कोणी तुमच्या समोर खोकले की त्याचे तुषार थेटपणे तुमच्या नाकात जाणार नाहीत. मास्क, रुमाल स्वच्छ धुतलेला हवा, धुतलेल्या हाताने मास्क लावावा; नंतर मास्कला, रुमालाला हात लावू नये. नाहीतर उलटा परिणाम होईल. रस्त्यातून चालताना, वाहन चालवताना मास्क घालून उपयोग नाही कारण रुग्णाशी घनिष्ट संपर्क आला तरच विषाणू लागण होते.

करोना खोकला, ताप झाल्याची शंका केव्हा घ्यायची ?

कोरडा खोकला व जोरदार ताप असा त्रास झाला तर घरी न बसता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांनी करोना तापाची साथ असलेल्या देशातून, भागातून प्रवास केला असेल किंवा ज्यांचा रुग्णाशी घनिष्ट संपर्क आला असेल (दोन मीटरच्या आतील अंतर, १५ मिनिटापेक्षा जास्त संपर्क) त्यांच्या घशातील स्त्रावाची करोना विषाणू बाबत तपासणी करायला हवी. सरकारी दवाखान्यात ती मोफत होते. तपासणीचा रिपोर्ट नेगेटिव्ह येईपर्यंत घराबाहेर जाऊ नये, विश्रांती घ्यावी. करोना रुग्ण व कुटुंबीय यांनी घ्यायची काळजी याबाबत डॉक्टरी सल्ला पाळावा.

कोरोना- खोकला-तापावर काय उपचार आहेत ?

कोणत्याही औषधाने करोना विषाणू मारत नाहीत. पूर ओसरण्याची वाट बघावी लागते तसे शरीर या विषाणूंवर विजय मिळवण्याची वाट पहावी लागते. तोपर्यंत विश्रांती, तापावर गोळ्या, गरज लागल्यास कृत्रिम श्वासाची व्यवस्था असे उपाय करतात.

करोना-साथी वर लस नाही का?

नाही. संशोधन चालू आहे. लस तयार होऊन त्यावर निरनिराळ्या चाचण्या होऊन करोना लस बाजारात यायला एक, दीड वर्ष लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.