ETV Bharat / state

पाच महत्त्वाच्या भेटीतून समजून घ्या महाराष्ट्राचे राजकीय गणित - Special news on Maharashtra politics

कोरोना जरा कमी झाला नाही तर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आज राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच मोदींचे कौतुक केले. त्यांच्याबद्दल नरमाईची भाषा राऊत यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीला धोका नाही, असे विधान शरद पवार यांनी केले. अलिकडच्या काळातील एकूणच राजकीय नेत्यांच्या मुलाखती पाहता नजिकच्या भविष्यात राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 11, 2021, 10:56 PM IST

Updated : Jun 11, 2021, 11:34 PM IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच मोदींचे कौतुक केले. त्यांच्याबद्दल नरमाईची भाषा राऊत यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीला धोका नाही, असे विधान शरद पवार यांनी केले. अलिकडच्या काळातील एकूणच राजकीय नेत्यांच्या मुलाखती पाहता नजिकच्या भविष्यात राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

  • प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची मुलाखत

पश्चिम बंगालचा गड यशस्वी लढल्यानंतर राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे दिसते. त्यांनी आज (दि. 11 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. एकीकडे आता कोणत्याही राजकीय पक्षाला सल्ला देण्याचे काम करणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर स्पष्ट केले होते. दुसरीकडे ते शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि सक्रिय नेत्याची भेट घेत आहेत. त्यामुळे चर्चा तर होणारच. त्यातच या दोघांच्यामध्ये प्रदीर्घ म्हणजेच तब्बल तीन तास चर्चा झाल्याने या गप्पा केवळ हवापाण्याच्या असण्याची सुतराम शक्यता नाही. दोघांमध्ये राष्ट्रीय राजकारणातील संभाव्य समिकरणे नक्कीच चर्चेला आली असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयरथ पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी रोखला आहे. प्रशांत किशोर यांचा सल्ला त्यांना चांगलाच मानवला आहे. या पार्श्वभूमीवर पवार-किशोर भेट ही महत्त्वाची आहे. देशपातळीवर 'बंगाल मॉडेल' राबवायचे झाल्यास त्यासंदर्भातील शक्यताही पवार-किशोर यांच्या भेटीत चर्चेत आल्या असतीलच. राज्यातील राजकारणाचे समीकरण आणखी कसे मजबूत करता येईल. तसेच यामध्ये काही गडबड झाली, तर सत्ता सावरण्याचे काय पर्याय असू शकतील. यावर दोघांच्यात नक्कीच चर्चा झाली असणार. आता या चर्चेचे पडसाद नजिकच्या भविष्यात पाहायला मिळतीलच.

  • शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेट

नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अचानकच फडणवीस यांनी पवारांची भेट घेतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अर्थातच या भेटीनंतर दोन्ही बाजूने या भेटीचा कुणीही काही राजकीय अर्थ काढू नये, असे सांगण्यात आले. फडणवीस यांचीही पवारांबरोबर केवळ सदिच्छा भेट होती, असे सांगण्यात आले.

  • उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी यांची भेट

मराठा आरक्षण आणि कोरोनाच्या उपाययोजनांच्या संदर्भात नुकतेच महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. यावेळी शिष्टमंडळाबरोबर पंतप्रधान मोदींची चर्चा झाली. त्याच्या बातम्याही सर्वांनी केल्या. त्याचवेळी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही बंददरवाजाआड भेट झाली. या भेटीमध्ये नेमके काय झाले, हे सांगणे कठीण आहे. मात्र, शिष्टमंडळाच्या भेटीबरोबरच ही वेगळी फक्त मोदी-ठाकरे यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण असल्याचे मानण्यात येते. यामध्ये नक्कीच काहीही राजकीय चर्चा झाली नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

  • शरद पवार-अमित शाह यांची भेट

देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांची मार्च महिन्यात शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये भेट घेतली, असे वृत्त आले होते. मात्र, ही भेट झालीच नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यानंतर स्पष्ट केले. अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर ही भेट झाल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते, असेही वृत्त होते. मात्र, असे काही घडलेच नाही असे सांगून या भेटीबाबतच्या सगळ्याच गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावल्या होत्या. मात्र, या भेटीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, अशी भाकिते वर्तवण्यात आली होती.

  • शरद पवार-उद्धव ठाकरे यांची भेट

शरद पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री दिल्लीला जाण्यापूर्वीच आदल्या दिवशी पवार हे ठाकरेंना भेटले. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षण आणि इतर मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या भेटीला जाण्यापूर्वी पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, त्यांना नक्कीच काहीतरी कानमंत्र दिला असण्याची शक्यता आहे. कारण पवार आजारपणातून बरे झाल्यानंतर एकीकडे त्यांना विविध नेते भेटायला येत असताना, पवार मोदींच्या भेटीपूर्वी ठाकरेंना भेटले याला एक वेगळेच महत्व आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या या भेटी जर पाहिल्या तर त्यामध्ये राजकीय खलबते झाली असणार हे निश्चितच आहे. विविध पातळ्यांवर विविध कारणांच्या निमित्ताने या भेटी झाल्या असल्या तरी कोरोनाच्या काळातही राज्यातील राजकारण तापले आहे, असेच म्हणावे लागेल. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा कोरोना हाताळण्याचा आणि लसिकरणाचा मुद्दा. राजकीय खलबते ही चांगलीच रंगली आहेत. ही खलबते म्हणजे हिमनगाचे टोकच म्हणता येईल. याचे साधक-बाधक अर्थ काढले जात आहेत. मात्र, नजिकच्या काळात या सर्वच खलबतांच्या मागील रहस्य राजकीय पटलावर समोर येतील, अशी अपेक्षा आज करण्यात हरकत नाही.

महाराष्ट्राच्या विधानसभेतील सध्याचे संख्याबळ

एकूण जागा - 288

भाजप - 106

शिवसेना - 57

राष्ट्रवादी काँग्रेस - 63

काँग्रेस - 43

इतर - 29

Last Updated : Jun 11, 2021, 11:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.